महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Canada Relations : भारत-कॅनडा वाद; 'या' देशानं दिला भारताला पाठिंबा, कॅनडाला फटकारलं - श्रीलंका विरुद्ध कॅनडा

India Canada Relations : भारत-कॅनडा यांच्यात तणावाचं वातावरण आहे. या वादावर इतर देशातील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया देत भूमिका मांडली. या वादावर आता भारताचा शेजारील देश असलेल्या श्रीलंकेनंही प्रतिक्रिया देत कॅनडाला फटकारलंय.

Etv Bharat
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:06 AM IST

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : India Canada Relations : भारत-कॅनडा संघर्षाच्या दरम्यान भारताला आता श्रीलंकेचा पाठिंबा मिळालाय. भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादावर मंगळवारी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांचं वक्तव्य समोर आलंय. ते म्हणाले की, कॅनडा हे दहशतवाद्यांचं सुरक्षित आश्रयस्थान बनलंय. त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वाखालील उत्तर अमेरिकन देशात दहशतवाद्यांना संरक्षण मिळत असल्याचं अली साबरी म्हणाले.

कॅनडाच्या पंतप्रधानांना फटकारलं : कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय काही अपमानजनक आरोप करणं म्हणजे दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा एक मार्ग आहे. ट्रूडो यांनी याआधी श्रीलंकेबाबतही अफवा पसरवल्या आहेत. त्यामुळं कॅनडा हे दहशतवाद्यांचं सुरक्षित आश्रयस्थान बनलंय, असं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी म्हणाले. त्यामुळं आता श्रीलंकेनं भारताच्या बाजूनं भूमिका मांडल्याचं दिसून येतंय.

कॅनडानं श्रीलंकेवरही केले होते आरोप : कॅनडा पंतप्रधान ट्रूडो यांनी श्रीलंकेबद्दल याआधी खोट्या अफवा पसरवल्या होत्या. श्रीलंकेत नरसंहार झाला होता, अशा प्रकारची खोटी माहिती ट्रूडो यांनी पसरवली होती. त्यामुळं पुराव्याशिवाय अपमानजनक आरोप करणं ही त्यांची पहिल्यापासूनची सवय असून, त्यात नवीन काही नाही, अशी खोचक प्रतिक्रिया अली साबरी यांनी दिली. कॅनडानं श्रीलंकेवर नरसंहारचे आरोप करणं हे भयंकर खोटं होतं. आपल्या देशात एकही नरसंहार झाला नाही हे सर्वांना माहिती आहे, असेही अली साबरी म्हणाले.

श्रीलंकेचा भारताला पाठिंबा : खलिस्तानवादी नेत्याच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. त्यानंतर भारतानं हे आरोप लगेच फेटाळून लावले होते. यावर श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना सल्ला दिलाय. सार्वभौम देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, कोणत्याही देशानं इतर देशांच्या कारभारात ढवळाढवळ करून आपला राज्य कारभार कसा चालतो हे सांगावं असं मला वाटत नाही, असा सल्ला अली साबरी यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. Canada Travel Advisory India : भारत-कॅनडात तणाव; भारतातील कॅनडा नागरिकांना सतर्क राहण्याचा 'ट्रूडों'चा सल्ला
  2. Nijjar Murder Case : निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचे एजंट असू शकतात - जस्टिन ट्रूडो
  3. CIA-style: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कॅनडाला दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details