हैद्राबाद India Canada Relations : 'भारतीय एजंट'वर कॅनडात एका खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्याला ठार मारल्याचा आरोप कॅनडानं केला आहे. यानंतर भारत, कॅनडामध्ये राजनैतिक तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, भारत-कॅनडा संबंधांकडं पाहताना देशातील शेतकरी तसंच कृषी उत्पादनांच्या दृष्टीकोनातून पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भारत, कॅनडामधील संबंध तातडीनं सुधारले नाहीत तर भारताच्या अन्न अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतावर केले गंभीर आरोप : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्याच्या कथित हत्येबद्दल संसद, तसंच कॅनेडीयन माध्यमांसमोर भारत सरकारकडं बोट दाखवलं आहे. त्यामुळं दोन्ही देशातील व्हिसासह व्यापार निर्बंध हे त्यावर राजनैतिक उपाय करण्यात येत आहेत. यामध्ये शुल्क, व्यापार निर्बंध, राजदूतांना परत बोलावणं यासारख्या घटनांचा समावेश आहे. पण तुम्ही म्हणाल याचा शेतीशी काय संबंध? मात्र, याचा शेतीशी खोलवर संबंध आहे.
खतांच्या किमती वाढल्या :रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून खतांच्या किमती वाढल्या आहेत. अलीकडे DAP च्या किमती 25% ने वाढल्या आहेत. NPK खताच्या किमती देखील वाढल्या आहेत. इथंच कॅनडा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. कॅनडामध्ये पोटॅशचा जगातील सर्वात मोठा साठा आहे. औद्योगिक, शेतीसाठी एमओपी खताच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे खनिज आहे. 30% पेक्षा जास्त जागतिक पोटॅशसाठा तसंच पोटॅशचा सर्वोच्च उत्पादक देश म्हणून कॅनडा गेल्या वर्षी प्रथम MOP क्रमांकाचा पुरवठादार देश होता.
खतांचा पुरवठा खंडित :युक्रेन रशिया संघर्षामुळं खतांचा पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळं भारताकडं मर्यादित पोटॅश खतं आहेत. चीन, कॅनडा हे दोन्ही प्रमुख पोटॅश उत्पादक देश भारताच्या कृषी परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण करतायत. संबंध बिघडत असताना, कॅनडा भारताकडून सवलतींची मागणी करून याचा फायदा घेऊ शकतो, कदाचित कॅनडाच्या पोटॅश निर्यातीवर संपूर्ण बंदी घालण्यासाठी भारतावर दबाव आणू शकतो. अशा हालचालीमुळं भारताच्या अन्नसुरक्षेवर, पिकांवर घातक परिणाम होऊ शकतो.