दुबई :भारताकडून रॉड्रिग्सने 39 चेंडूंत नाबाद 42 धावा केल्या तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 23 चेंडूंत 32 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून शमिलिया कॉनेल आणि हेली मॅथ्यूज यांनी अनुक्रमे एक विकेट घेतली.
पहिल्या डावातील ही स्थिती होती : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 94 धावाच करू शकला. यामध्ये भारताकडून दीप्ती शर्माने 3, पूजा वस्त्राकारने 2 आणि राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली.
4 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले :दोन चेंडूत दोन बळी घेणाऱ्या दीप्तीने आज फलंदाज कोणत्या मूडमध्ये हे दाखवले. दिप्तीच्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज घामाघूम झाले. यानंतर दीप्तीने शबिका गजनबीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या स्टारने या सामन्यात 4 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले. विशेष म्हणजे यात दोन मेडिन षटकांचा समावेश होता. दीप्तीसोबत पूजा वस्त्राकरनेही शानदार गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली. टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीसमोर विंडीजचा संघ 20 षटकांत केवळ 94 धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या 13.5 षटकांत 8 विकेट्स राखून सामना जिंकला. भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी करताना 39 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 42 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने 23 चेंडूत 4 चौकार लगावत 32 धावा केल्या.
१०० धावांपासून ५ विकेट :दीप्ती शर्माच्या नावावर या तीन विकेट्ससह, महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 95 बळींची नोंद झाली आहे. दीप्तीने 86 सामन्यात 95 विकेट घेतल्या आहेत. ती आता 100 धावांपासून फक्त 5 विकेट्स दूर आहे. दीप्ती शर्मा 100 बळींचा टप्पा गाठताच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज बनेल. सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये पूनम यादव अव्वल स्थानावर आहे. पूनमने 72 सामन्यात 98 विकेट घेतल्या. दीप्ती 4 विकेट घेताच भारताची नंबर 1 गोलंदाज बनेल. महिलांच्या T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजची गोलंदाज अनिसा मोहम्मदच्या नावावर आहेत. अनिसाने 117 सामन्यात 125 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :मी माझ्या लोकांसोबत चाललो! राहुल गांधींना अश्रू अनावर; ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा समारोप