नवी दिल्ली: परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) काढलेल्या अधिसूचनेनुसार, देशांतर्गत वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून देशात तात्काळ प्रभावाने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, या अधिसूचनेच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ज्या निर्यात शिपमेंटसाठी अपरिवर्तनीय क्रेडिट पत्र (एलओसी) जारी केले गेले आहेत त्यांना परवानगी दिली जाईल, असे परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
Wheat Export Banned : देशात गव्हाच्या किमती उतरणार.. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंदी - परकीय व्यापार महासंचालनालय गहू निर्यात बंदी
परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) देशात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत एक अधिसूचना काढण्यात आली असून, या अधिसूचनेपूर्वी जे व्यवहार झालेले असतील त्यांनाच निर्यातीसाठी परवानगी राहील असे परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सांगितले. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
कांदा बियाण्यांच्या निर्णयातीवरची बंदी उठवली :भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि त्यांच्या सरकारांच्या विनंतीनुसार गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. वेगळ्या अधिसूचनेत, DGFT ने कांदा बियाण्यांसाठी निर्यात अटी शिथिल करण्याची घोषणा केली. "कांदा बियाण्यांचे निर्यात धोरण तात्काळ वस्तुस्थितीसह प्रतिबंधित श्रेणीत ठेवले आहे," असे त्यात म्हटले आहे. कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर पूर्वी बंदी होती.