महाराष्ट्र

maharashtra

संकटकाळात भारताचा मदतीचा हात... अफगाणिस्तानी नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर

By

Published : Aug 17, 2021, 4:41 PM IST

भारतामध्ये येणाऱ्या नागरिकांकरिता फास्ट ट्रॅक पद्धतीने हा व्हिसा सुरू करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारताने अफगाणिस्तानमधील कामे थांबविली आहेत. त्यामुळे व्हिसाकरिता ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी वैध असणार आहे.

ई-व्हिसा जाहीर
ई-व्हिसा जाहीर

नवी दिल्ली - संकटकाळात अफगाणिस्तान नागरिकांना भारताने मदतीचा हात देऊ केला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सत्तेत येत असताना अनेक अफगाणिस्तानमधील नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे. ही स्थिती लक्षात घेता भारताने अफगाणिस्तानमधील नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर केला आहे.

धर्माचा भेदभाव न करता अफगाणिस्तानचा कोणताही नागरिक ई-इमर्जन्स- एक्स मिस्क व्हिसा ऑनलाईन करू शकतो. या अर्जांवर नवी दिल्लीमध्ये प्रक्रिया होणार आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान देश ताब्यात घेतला आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती लक्षात घेतला केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसाच्या नियमांचे पुनरावलोकन केले आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसामध्ये ई- इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा ही नवीन वर्गवारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या भीतीने उच्चशिक्षित दाम्पत्याने घेतला गळफास, कोराना रिपोर्ट आला निगेटिव्ह

व्हिसा सहा महिन्यांसाठी असणार वैध

भारतामध्ये येणाऱ्या नागरिकांकरिता फास्ट ट्रॅक पद्धतीने हा व्हिसा सुरू करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारताने अफगाणिस्तानमधील कामे थांबविली आहेत. त्यामुळे व्हिसाकरिता ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी वैध असणार आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांना व्हिसाकरिता अर्ज मंजुरी देताना सुरक्षेच्या मुद्द्यांचा विचार करण्यात येणार आहे.

हेही वाचा-काबुलमधील भारतीय राजदुतांसह कर्मचाऱ्यांना मायदेशात आणणार, हवाईदलाचे सी-17 जामनगरला उतरले

काबुलमधील विमानतळावर सात जणांचा मृत्यू

दरम्यान, काबुलमधील मुख्य विमानतळावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. तालिबानींच्या भीतीने नागरिक हे विमानावर चढले होते. विमान उड्डाण करत असताना विमानावरून खाली पडल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. काबुलमधील विमानतळावर गोंधळ सुरू असताना किमान सात जणांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. 20 वर्षानंतर अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैनिक हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणवर ताबा मिळविला आहे.

हेही वाचा-काबुलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेची तालिबानने दिली ग्वाही- मनजिंदर सिंग सिरसा

शीख आणि हिंदू समुदायांच्या प्रतिनिधींशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संपर्कात-

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की अफगाणिस्तानमधील स्थितीवर भारत सरकार जवळून देखरेख करत आहे. अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू समुदायांच्या प्रतिनिधींशी सातत्याने संपर्कात आहोत. ज्यांना अफगाणिस्तान सोडायचा आहे, त्यांना भारतात येण्यासाठी सुविधा देण्याची ग्वाहीदेखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे. अफगाणिस्तानमधील शैक्षणिक, सामाईक विकास आणि लोकांकडून लोकांना मदत होण्यासाठी भारताकडून विविध प्रोत्साहपर कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात भागीदार असलेल्या व्यक्तींच्या पाठिशी आम्ही उभे राहणार आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details