दुबई - आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 111 धावाच करू शकला. त्यासाठी इब्राहिम झद्रानने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. (IND vs AFG) मुजीब उर रहमानने 18 आणि रशीद खानने 15 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ बळी घेतले. अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. तत्पूर्वी, विराट कोहलीने भारताच्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने 122 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारताचा महान फलंदाज विराट कोहलीची प्रतीक्षा अखेर आजच्या सामन्यात संपली. दुबईत सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 122 धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने 61 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 200.00 होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने अंगठीचे चुंबन घेतले. त्यांनी असे का केले हे लोकांना जाणून घ्यायचे होते. या खेळीनंतर विराटने याचा खुलासाही केला.