नवी दिल्ली -कोरोना लसीकरणात देशाने मैलाचा दगड गाठला आहे. कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीत आज भारताने 75 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील नागरिकांचे अभिनंदन केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत लसीकरणातील टप्प्यावर मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ सबका प्रयास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सातत्याने नवीन टप्पे गाठत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाने 75 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचा-मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मिळणार उपनिषदासह पुराणाचे धडे!