नवी दिल्ली : देशातील जनतेने 2019 च्या निवडणुकीत भाजपाला भरभरुन आशीर्वाद दिला. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेवर आले आहे. देशाच्या विकासासाठी आगामी 5 वर्ष महत्वाची ठरणार आहेत. या 5 वर्षातच 2047 ची केलेली स्वप्नपूर्ती होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरुन मी केलेल्या कामाची उपलब्धी देशातील जनतेसमोर ठेवणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन बोलताना दिली. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातीला नागरिकांशी संबोधून भाषण करत होते.
राजकीय पक्षाची धुरा एकाच कुटुंबाकडे कशी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना काँग्रेसवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. एका पक्षाची धुरा वर्षानुवर्ष एकाच कुटुंबीयांकडे कशी असू शकते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या लोकांचा परिवाराने परिवारांसाठी चालवलेला पक्ष हाच जीवनमंत्र असल्याची टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आगामी 25 वर्षात आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन देशाचा विकास करावा लागणार असल्याचेही पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
सीमेवरचे गाव शेवटचे नाही, तर पहिले :आतापर्यंत सीमेवरच्या गावाला सगळ्यात शेवटचे गाव म्हणून संबोधले जात होते. मात्र माझी संकल्पना वेगळी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. सीमेवरचे गाव हे शेवटचे गाव नसून ते सीमेवरचे पहिले गाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेल. सीमेपासूनच देशाची सुरुवात होते, असेही ते यावेळी म्हणाले. सीमेवरील गाव असलेल्या 600 सरपंचांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलावले.
- भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार :भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत आहे. जागतिक पातळीवरही भारतीय अर्थव्यवस्थेला महत्वाचे मानले जाते. मात्र आगामी 5 वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, ही नरेंद्र मोदींचे वचन असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा तर महिला नेतृत्ववाला विकास :देशातील महिला सक्षम होत आहेत. भारताने विकास क्षेत्रात विकास केला असून यात महिलांचा सहभाग लक्षणिय आहे. त्यामुळे भारताचा विकास हा महिला नेतृत्ववाला विकास असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आज देशातील विमान उड्डाण क्षेत्रात सर्वाधिक महिला पायलट आहेत. अवकाश संशोधनात महिला नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भारत महिलांच्या नेतृत्वात विकास करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -
- Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आजवर कोणत्या मोठ्या घोषणा केल्या होत्या? वाचा सविस्तर