महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आजवर कोणत्या मोठ्या घोषणा केल्या होत्या? वाचा सविस्तर - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन देशातील नागरिकांना संबोधित केले आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना अनेक घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आजवर जाहीर केलेल्या घोषणांवर व निर्णयावर नजर टाकू.

Independence Day 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Aug 15, 2023, 9:51 AM IST

नवी दिल्ली :देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकाविला आहे. दहा वर्षाच्या कार्यकालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणात जन धन योजना :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नाही, तर प्रधान सेवक म्हणून जनतेसाठी कार्य करत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. लोकसहभागातून देशाचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले होते. म्हणून त्यांनी लाल किल्ल्यावरील पहिल्याच भाषणात जन धन योजना सुरु केली होती. बँक खाते नसलेल्या नागरिकांना बँकींग करण्यासाठी ही योजना सरकराने अमलात आणली होती.

स्वच्छ भारत अभियान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला 2014 ला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच देशाचा उत्तम विकास होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती.

18 हजार 500 गावात वीज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील काही भागात अद्यापही वीज नसल्याचा मुद्दा उचलून धरला. आगामी 100 दिवसात देशातील 18 हजार 500 गावात वीज पोहोचवण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देश आता टीम इंडिया असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच वर्षी त्यांनी सैन्यातील जवानांसाठी वन रँक वन पेंशन योजना सुरु केली.

पाकिस्तानला केले आवाहन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा 2016 साली केली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानला आवाहनही केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गरीबी फार वाढली आहे. आमच्या शेजारी देशातही गरीबी वाढली आहे. त्यामुळे आपण सोबत गरीबीशी लढू. आपल्याच नागरिकांसोबत लढल्याने आपण आपलेच नुकसान करुन घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

शेतकऱ्यांना डबल उत्पन्न करण्याचे दिले होते आश्वासन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये शेतकऱ्यांना आपण मिळून राष्ट्राची निर्मिती करू असे आवाहन केले होते. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्त्पन्न डबल होईल, असे आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना 2017 मध्ये दिले होते. देशात डिजिटल व्यवहार करण्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आवाहन केले होते.

गगनयान आणि पंतप्रधान जन आरोग्य अभियान :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 ला लाल किल्ल्यावरुन नागरिकांच्या हिताच्या अनेक घोषणा केल्या होत्या. याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश संशोधनाला चालना देण्यासाठी गगनयान अभियान सुरु केले. त्यानंतर नागरिकासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेचीही सुरुवात केली.

पहिल्या संरक्षण प्रमुखांची नियुक्ती : देशाच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी देशाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय स्थापन करण्यासाठी पहिल्या संरक्षण प्रमुखांची नियुक्ती केली होती. विपीन रावत यांची देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र विपीन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 मध्ये तामीळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत भारत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 ला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. ही योजना देशातील नागरिकांना लागू करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक भारतीयाला आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली. याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावांच्या विकासासाठी ऑप्टीकल फायबर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनआयपी ( National Infrastructure Pipeline ) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

जगाला पुरवली कोरोनाची लस :जगभरात 2021 मध्ये कोरोनाने थैमान घातले होते. अशावेळी भारताने देशातील नागरिकांसह जगभराला कोरोनाची लस पुरवण्याचे कार्य केले. मेक इन इंडिया कोरोना लसीने जगभरातील नागरिकांना फायदा झाला. याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गती शक्ती प्रकल्प सुरु केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुपोषणाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी योजना कार्यान्वित केली. या योजनेनुसार कुपोषणग्रस्त भागात तांदळाचे वाटपही करण्यात आले.

आझादी का अमृत महोत्सव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाची घोषणा केली. या योजनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना देशासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. यात दुष्काळ असणाऱ्या परिसरातील नागरिकांना जलसंवर्धनासाठी काम करण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बाहद्दुर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी आदींचे स्मरण केले.

हेही वाचा-

  1. India independence Day 2023 Updates: बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे-पंतप्रधान मोदी
  2. Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ
  3. Independence day 2023 : देशप्रेम जागविणारे ६ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित, सॅम बहादूर ते अटल बिहारींच्या भूमिका कोणते कलाकार करणार?

ABOUT THE AUTHOR

...view details