महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Independence Day 2023 : भारतच नाही तर या पाच देशांनाही मिळाले १५ ऑगस्टला स्वातंत्र्य... - स्वातंत्र्यदिन साजरा करणार

यंदा आपला देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. १५ ऑगस्टला स्वतंत्र झालेला भारत हा एकमेव देश नसून इतर कोणते देश स्वातंत्र्य झाले ते जाणून घेऊया.

Independence Day 2023
या देशांनाही मिळाले १५ ऑगस्टला स्वातंत्र्य

By

Published : Aug 10, 2023, 3:48 PM IST

हैदराबाद :सध्या देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी गुलामगिरीचे बेड्या तोडून भारतातून स्वातंत्र्याची पहाट झाली. तेव्हापासून दरवर्षी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या क्रमाने भारत यावर्षी आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. भारतासोबतच असे चार देश आहेत जे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. जाणून घेऊया कोणते देश आहेत.

बहारीन :१५ ऑगस्ट १९७१ रोजी बहरीनवरील ब्रिटीश वसाहती राजवटही संपली. भारताला स्वातंत्र्य मिळून दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर बहरीनने या दिवशी आपले स्वातंत्र्य घोषित केले. मात्र, हा देश या दिवशी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत नाही. दिवंगत शासक इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या सिंहासनावर आरूढ झाल्याबद्दल 15 ऑगस्ट ऐवजी देश 16 डिसेंबर हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो.

उत्तर आणि दक्षिण कोरिया : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश दरवर्षी १५ ऑगस्ट हा कोरियाचा राष्ट्रीय मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. खरं तर, हा दिवस द्वितीय विश्वयुद्धाच्या शेवटी 35 वर्षांचा जपानी ताबा आणि कोरियावरील वसाहती शासनाचा अंत आहे. स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी कोरियाचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये विभाजन झाले. दक्षिण कोरियामध्ये हा दिवस 'ग्वांगबोकजेओल' (म्हणजे प्रकाश परत आला तो दिवस) म्हणून ओळखला जातो, तर उत्तर कोरियामध्ये तो 'चोगुखाएबांगुई नाल' (म्हणजे, पितृभूमीच्या मुक्तीचा दिवस ) म्हणून ओळखला जातो.

लिकटेंस्टीन : लिकटेंस्टीन 15 ऑगस्ट रोजी आपला राष्ट्रीय दिवस देखील साजरा करतो. जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात लहान देश लिक्टेनस्टीन १८६६ मध्ये जर्मन राजवटीपासून स्वतंत्र झाला. हे ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड दरम्यान युरोपियन आल्प्समध्ये स्थित आहे. हा देश 1940 पासून 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करत आहे. 5 ऑगस्ट, 1940 रोजी, लिकटेंस्टाईन सरकारने अधिकृतपणे 15 ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले.

रिपब्लीक ऑफ द काँगो : काँगो हा आफ्रिका खंडाच्या मध्यभागी वसलेला एक लोकशाही देश आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 वर्षांनी 15 ऑगस्ट 1960 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळाले. याआधी १८८० पासून स्वातंत्र्यापर्यंत फ्रान्सच्या ताब्यात होता. काँगो हा आफ्रिकन खंडातील क्षेत्रफळानुसार तिसरा सर्वात मोठा देश आहे.

हेही वाचा :

  1. Important days in august 2023 : जाणून घ्या, ऑगस्ट २०२३ मधील महत्त्वाचे दिवस
  2. Independence Day 2023 : ऑगस्ट क्रांती दिन 2023; जाणून घ्या भारतीय स्वातंत्र्याचा कसा रचला पाया
  3. Independence Day 2023 : केवळ कोहिनूरच नाही तर 'या' मौल्यवान वस्तूचीही इंग्रजांनी केली भारतातून चोरी

ABOUT THE AUTHOR

...view details