नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 76 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंगी पट्ट्यांचा फेटा परिधान केला होता. त्यांचा फेटाही आकर्षणाचे कंद्र ठरत होता. पारंपारिक कुर्ता आणि चुरीदार पायजमा यांच्यावर निळे जाकीट आणि काळे बूट परिधान केलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकावला आणि सलग नवव्यांदा राष्ट्राला संबोधित केले. त्याचबरोबर, मोदींनी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आकर्षक, चमकदार आणि रंगीबेरंगी फेटा परिधान करण्याचा ट्रेंड मोदींनी चालू ठेवला. पंतप्रधानांचा फेटा मागे लांब होता आणि त्यावर तिरंग्याचे पट्टेही होते.
गेल्यावेळी स्वातंत्र्यदिनी मोदींनी भगवा फेटा परिधान केला होता. ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या समारंभात मोदींनी भगवा आणि क्रीम रंगाचा फेटा परिधान केला होता. पंतप्रधानांनी कुर्ता आणि चुरीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी भगवी किनार असलेला पांढरा गमछा देखील घातला होता. जो त्यांनी कोविड-19 विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरला होता. 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक रंगांनी बनवलेला फेटा परिधान केला होता. लाल किल्ल्यावरून हे त्यांचे सलग नववे भाषण होते.