मुंबई :15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होती. त्यानिमित्त देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठई देशभरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. 75 वर्षांच्या निमित्त आझादी का अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Azadi) या टॅगलाईन खाली वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज आपण 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील पाच ऐतिहासिक स्मारकांच्याबाबत जाणून घेणार ( Independence Day 2022 ) आहोत.
लाल किल्ला -दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रत्येक वर्षी पंतप्रधान तिरंगा फडकवून देशातील जनतेला संबोधित करतात. मुघल सम्राट बहादूर शाह जफरने 1857 च्या बंडात सहभाग घेतला होता. मात्र, या बंडामध्ये भारतीय क्रांतिकारकांचा पराभव झाला होता. त्यानंतर सम्राट जफरला रंगूनला पाठवले गेले. पण, ज्या ज्या वेळी लाल किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला गेला आहे.
इंडिया गेट -अँग्लो-अफगाण युद्धामध्ये विरमरण आलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया गेट बांधण्यात आलं. हे युद्ध स्मारक म्हणून ओळखलं जातं. त्याचसोबत, 1971 साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होते. तेव्हाच्या झालेल्या युद्धात विरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 साली इंडिया गेटवर अमर जवान ज्योती बांधली गेली. 1972 ते 2022 ही ज्योती धगधगत होती. पण, भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलगीकरण करण्यात आलं.