फ्लोरिडा: भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार ( IND vs WI 5th T20 ) आहे. या सामन्याला रात्री आठला सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( India opt to bat ) आहे.
या मालिकेत भारतीय संघाने अगोदर 3-1 ने विजयी आघडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना फक्त औपचारिक्ता असणार आहे. भारताने शनिवारी चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा एकतर्फी 59 धावांनी पराभव केला होता. तसेच आज ही भारतीय संघ त्याच निर्धाराने मैदानात प्रवेश करेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा मालिकेची सांगता विजयाने करण्यासाठी उत्सुक असणार आहे.