महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IND vs WI 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी-20 सामना रात्री दहाला होणार सुरु, जाणून घ्या काय आहे कारण

क्रिकेट वेस्ट इंडिज ( Cricket West Indies ) ने म्हटले आहे की, संघाचे सामान येण्यात उशीर झाल्यामुळे, सोमवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना ( IND vs WI 2nd T-20 ) भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता (IST) आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरु होणार आहे.

LIVE India vs West Indies 2nd T20I Score & Updates.
भारत विरुद्ध विंडीज

By

Published : Aug 1, 2022, 7:41 PM IST

बासेटेरे (सेंट किट्स):भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका ( West Indies vs India T20 Series ) खेळली जात आहे. या मलिकेतील दुसरा सामना सोमवारी बसेटेरे येथे होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार होती, परंतु यावेळेत बदल करण्यात आला ( Ind vs WI 2nd T20 delayed ) आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या टी-20 सामन्याला ( IND vs WI 2nd T-20 ) रात्री दहाला सुरुवात होणार आहे. कारण खेळाडूंचे सामान अद्याप मैदानावर पोहोचले नसल्याने हा प्रकार घडला आहे, त्यामुळे किट आणि इतर सामानाशिवाय खेळणे अशक्य आहे.

क्रिकेट वेस्ट इंडिजकडून एक निवेदन जारी करण्यात ( Statement issued by Cricket West Indies ) आले आहे की, अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, जी बोर्डाच्या हाताबाहेर गेली आहे. काही कारणांमुळे खेळाडूंचे सामान त्रिनिदाद ते सेंट किट्सपर्यंत वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. वेस्ट इंडीज बोर्डाने सांगितले की, आता हा सामना रात्री 10 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल, तर स्थानिक वेळ दुपारी 12:30 वाजता असेल. हा सामना सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये खेळला जाणार आहे.

मालिकेत सतत व्यत्यय -

याआधी सोमवारी सकाळी भारत-वेस्ट इंडिज संघाला अद्याप अमेरिकेचा व्हिसा मिळालेला ( India-West Indies team not US visa ) नसल्याची बातमी आली होती. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, ज्यासाठी टीम इंडिया तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रवाना होणार आहे. मात्र आतापर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना व्हिसा मिळू शकलेला नाही.

विशेष म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पहिला सामना जिंकला असून आता मालिकेत आघाडी घेण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका आधीच जिंकली आहे, टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करून टी-20 विश्वचषकाची तयारी ( T20 World Cup preparations ) सुधारण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा -Bhuvneshwar Kumar Statement : 'माझ्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमध्ये कोणताही बदल झालेला नाही, मेहनतीमुळे मिळाले यश'

ABOUT THE AUTHOR

...view details