तिरुवनंतपुरम: भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA T20 Series ) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ( IND vs SA 1st T20 ) ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरम ( Greenfield International Stadium Thiruvananthapuram ) येथे खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. या मालिकेद्वारे भारतीय संघ डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी सुधारण्याच्या आणि फलंदाजांना चांगला सराव देण्याच्या उद्देशाने टी-20 विश्वचषकात उतरणार आहे.
तीन खेळाडू भारतीय संघात दाखल -
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतातून आलेले तीन संघात दाखल झाले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव,अष्टपैलू शाहबाज अहमद आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 आकडेवारी ( India vs South Africa T20 Stats ) -
दुसरीकडे, टी-20 मालिकेबद्दल बोलायचे तर, भारत आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेला त्याच्या भूमीवर पराभूत करू शकला नाही. भारताने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकूण तीन टी-20 मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये एक दक्षिण आफ्रिकेने जिंकली आणि दोन मालिका अनिर्णित राहिल्या. त्यामुळे या दृष्टीने भारताला चांगली संधी आहे.
त्याचबरोबर टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आपल्या खेळात अनेक सुधारणा करण्यासाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला होता की, डेथ बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. भारतीय संघाला त्याचे दोन प्रमुख गोलंदाज, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांची उणीव भासेल. ज्यांना टी-20 विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद शमी अद्याप कोरोना संसर्गातून बरा झालेला नाही. त्यामुळे तो तिन्ही सामने खेळू शकणार नाही. हर्षल पटेल दुखापतीतून बरा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परतला, पण त्याने 12 च्या सरासरीने धावा खर्च केल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट नऊच्या वर होता.
विश्वचषकासाठी स्टँडबाय दीपक चहरला ( Deepak Chahar ) गेल्या मालिकेत संधी मिळाली नाही. आता वेगवान गोलंदाजांना फिरवल्यास तो तीन सामन्यांमध्ये खेळू शकतो. अर्शदीप सिंगकडून स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे, जो जसप्रीत बुमराहला साथ देईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्टी सपाट राहिल्यानंतर तिसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलने टर्निंग पिचवर चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन चहल आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.