महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IND vs SA 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज तिसरा सामना, मालिका जिंकूनही भारतीय गोलंदाजांवर असेल नजर - क्रिकेटच्या मराठी न्यूज

भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA T20 Series ) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ( IND vs SA 3rd T20 ) मंगळवारी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथे झालेले पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे.

IND vs SA
IND vs SA

By

Published : Oct 4, 2022, 9:48 AM IST

इंदूर: कागदावर जरी हा निव्वळ औपचारिक सामना असला तरी, मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( IND vs SA T20 Series ) तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर पुन्हा एकदा खडतर आव्हान असेल. तिसरा सामना( IND vs SA 3rd T20 ) होळकर स्टेडियमवर ( Holkar Stadium Indore ) संध्याकाळी सातला सुरु होईल. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली T20I मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या स्थितीत आहे. परंतु 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी संघाने आणखी एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी फलंदाजीची फळी मजबूत -

बारा महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यातून बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची फळी खूप पुढे गेली आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी ( T20 World Cup 2022 ) फलंदाजीची फळी मजबूत दिसत आहे. संघातील बहुतेक फलंदाज तेच आहेत, जे UAE मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत खेळले होते. पण वृत्तीतील बदलामुळे फरक पडला आहे. आयसीसी स्पर्धेपूर्वी भारताचे आघाडीचे तीन फलंदाज चांगले फॉर्ममध्ये आहेत. लोकेश राहुलने ( Lokesh Rahul ) रविवारी आक्रमक अर्धशतक झळकावून त्याच्या स्ट्राइक रेटबद्दलची चिंता दूर केली.

सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये -

आशिया चषकापासून विराट कोहलीने ( Batter Virat Kohli ) 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यावेळी तीन अर्धशतकांव्यतिरिक्त त्याने बहुप्रतिक्षित शतकही झळकावले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्मानेही ( Captain Rohit Sharma ) काही प्रभावी खेळी खेळल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळणारा सूर्यकुमार यादवही उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा करत असून त्याला रोखणे गोलंदाजांसाठी कठीण ठरत आहे. कर्णधार रोहित त्याच्यावर इतका प्रभावित झाला आहे की, 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध संघाच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्याला थेट खेळवण्याचा विचार करत आहे.

सूर्यकुमारला ( Batter Suryakumar Yadav ) विश्रांती दिल्यास श्रेयस अय्यर त्याची जागा घेऊ शकतो. ऋषभ पंतला आतापर्यंत या मालिकेत फलंदाजीची संधी मिळालेली नाही. दिनेश कार्तिकला दुसऱ्या टी-20मध्ये सात चेंडू खेळायला मिळाले होते. त्यामुळे त्यालाही फलंदाजीसाठी अधिक वेळ मिळेल अशी आशा आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या गोलंदाजी, विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये समस्या वाढल्या आहेत. मात्र, हा स्टार वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषकातूनही बाहेर पडला ( Jasprit Bumrah out of T20 World Cup )आहे. भारताला आता त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे.

दीपक चहरची नवीन चेंडूने छाप -

विश्वचषकातील राखीव खेळाडूंपैकी एक असलेल्या दीपक चहरने ( Fast bowler Deepak Chahar ) नवीन चेंडूने छाप पाडली असली, तरी डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्शदीपने नवीन आणि जुने दोन्ही चेंडू प्रभावित केले आहेत, पण रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये तो खूपच महागडा ठरला. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने या काळात तीन नो-बॉलही टाकले. दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल तितकासा प्रभावी दिसला नाही आणि त्याला अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही.

बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजला मिळू शकते संधी -

लाल चेंडूचा महान गोलंदाज रविचंद्रन अश्विनला ( Spinner Ravichandran Ashwin ) आतापर्यंत या मालिकेत एकही बळी घेता आलेला नाही आणि मधल्या षटकांमध्ये संघाला त्याच्याकडून विकेट्सची अपेक्षा असेल. बुमराहच्या अनुपस्थितीत संघात समाविष्ट असलेल्या मोहम्मद सिराजला ( Fast bowler Mohammad Siraj ) होळकर स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळू शकते. गुवाहाटीमध्ये जास्त आर्द्रता असताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण झाले आणि त्यांनी भारतीय फलंदाजांना भरपूर फुलटॉस चेंडू फेकले. ज्यामध्ये त्यांना सुधारणा करावी लागेल.

टेंबा बावुमाचा फॉर्म हा संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय -

मालिका गमावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीत अनेक सकारात्मक बाबी आहेत. डेव्हिड मिलरने ( David Miller ) रविवारी नाबाद शतक झळकावले, तर क्विंटन डी कॉकनेही ( Quinton de Kock ) विश्वचषकापूर्वी अर्धशतक झळकावले. मालिकेतील दोन सामन्यांमध्ये खातेही उघडण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार टेंबा बावुमाचा ( Captain Temba Bavuma ) फॉर्म हा संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.

संघ खालीलप्रमाणे -

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, मार्को जेन्सेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, कावेनर्स, डेव्हिड मिलर , रिले रोझो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.

हेही वाचा -IND vs SA 2nd T20 : केएल राहुलचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजयानंतर सांगितली 'ही' मोठी गोष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details