बंगळुरू:रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA 5th T20 ) यांच्यातील खेळला जात असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द केला ( 5th T20 abandoned due to rain ) आहे. सामन्याच्या अगोदर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघात नाणफेक पार पडली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला होता.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Opener Rituraj Gaikwad ) बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 3.3 षटकात 2 बाद 28 अशी झाली होती. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. तेव्हा श्रेयस अय्यर (0) आणि रिषभ पंत (1) धावांवर नाबाद होते. सर्वांना आशा होती की, काही कालावधीनंतर पाऊस थांबेल आणि खेळ पुन्हा सुरु होईल, परंतु पावसाने सर्वांचीच निराशी केली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली.