बंगळुरु :येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेतील पाचवा ( IND vs SA 5th T20 ) आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली ( Rishabh Pant lost toss fifth time ) आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने ( Keshav Maharaj captain of South Africa ) नाणेफेक जिंकली प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचे दृष्टीने आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण आज जो संघ सामना जिंकेल, तो संघ मालिका आपल्या नावे करेल. कारण सध्या मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. म्हणून जो संघ आज सामना जिंकेल तो ट्रॉफीवर आपले नाव कोरेल.