दुबई : आशिया चषक Asia Cup 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना झाला आणि टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाने धमाकेदार सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ पाकिस्तानी संघावर टीका करत आहेत, तर काही क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या संघर्षाचे कौतुक केले.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदचे एक ट्विट Former captain Sarfraz Ahmed tweet चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानच्या एका महिला पत्रकारला फटकारले Sarfraz Ahmed scolded the woman journalist आहे. सर्फराज अहमदने ट्विट करून लिहिले की, 17 व्या षटकानंतर पाकिस्तान संघाचे नुकसान झाले, स्लो ओव्हर रेटमुळे पाच क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत (30 यार्ड) ठेवावे लागले.
सरफराज अहमदने लिहिले की, एक महिला पत्रकार नॅशनल टीव्हीवर पाकिस्तानी संघावर भडकत आहे, तोही संघर्षमय सामना झाला तेव्हा. महिला पत्रकार सांगत आहेत की ते धावा करत नाहीत आणि झेल सुद्धा पकडत नाहीत. कमाल आहे भाय.
पाकिस्तानी महिला पत्रकार आलिया रशीदने Pakistani female journalist Alia Rashid एका टीव्ही कार्यक्रमात पाकिस्तानी संघावर टीका केली होती. ज्यामध्ये ती म्हणाली की फखर जमानकडून झेल घेतला जात नाही आणि तो धावा देखील करू शकत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघाच्या कमकुवतपणा समोर येत आहेत.