नॉटिंघम:शनिवारी भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात टी-20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 49 धावांनी मात केली. त्यामुळे भारतीय संघाकडे 2-0 ने अशी विजयी आघाडी घेतली. तसेच या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना आज (रविवारी) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. कारण भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. तरी देखील भारतीय संघाचा क्लीन स्वीप देण्याचा निर्धार असणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाने मालिका गमावल्यानंतर शेवटचा आणि तिसरा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मागील दोन ही सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला मालिका गमवावी लागली.
इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज आणि कर्णधार जोस बटलरची ( Captain Jos Buttler ) बॅट या दोन सामन्यात थंडावली आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात इंग्लंड संघाला भारतीय लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले आहे. त्याचबरोबर पहिल्या फळीतील इतरही फलंदाज त्यासाठी कारणीभूत आहेत. दुसरीकडे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजी दोन्ही सुपरफॉर्ममध्ये आहेत.
संभाव्य इलेव्हन -