लंडन:भारत आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस स्टेडियमवर गुरुवारी पार ( IND vs ENG 2nd ODI ) पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 100 धावांनी पराभव ( England beat india by 100 runs ) केला. या सामन्यात इंग्लंडने भारताला 247 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु भारतीय संघ 38.5 षटकांत 146 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी आला होता. भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने ( Indian bowler Hardik Pandya ) जेसन रॉयला (23 ) बाद करत पहिला धक्का दिला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोन पहिल्या विकेट्साठी 41 धावांचे भागीदारी केली. इंग्लंडकडून मोईन अली याने 64 चेंडूत 47 धावा केल्या. त्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मोईन अलीने ठोकल्या होत्या. युजवेंद्र चहलने सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने जॉनी बेयरस्टो (38), ज्यो रुट (11) आणि बेन स्टोक्स (21) हे महत्त्वाचे बळी घेतले.
भारताने संधी गमावली -इंग्लंडचा अर्धा संघ 102 धावा तंबूत गेला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्याचा फायदा घेतला नाही. लियाल लिव्हिंगस्टोन (33), मोइन अली (47) आणि डेविड विली (41) यांच्या फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 246 पर्यंत गेला. सातव्या विकेटसाठी विली आणि मोइन अलीने सर्वाधिक 62 धावांची भागीदारी केली.
भारताला निर्धारित 50 षटकात 247 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताने डावाला सुरुवात केली, पण भारताची आघाडीची फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. आघाडीचे फलंदाज रोहित आणि पंतला खाते देखील उघडता आले नाही. त्यामुळे भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. तसेच सलामीवीर शिखर धवनने ( Opener Shikhar Dhawan ) केवळ 9 धावा केल्या.
विराटने पुन्हा केले निराश : रन मशिन म्हणवल्या जाणाऱ्या विराट कोहलीची बॅट आज पुन्हा धावा ओकू ( Virat Kohli fails again ) शकली नाही. वैयक्तिक 16 धावांच्या खेळीनंतर विराट कोहली बाद झाला. विराटशिवाय सूर्यकुमार यादवने 27, तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने 29-29 धावा केल्या. त्यामुळे लवकरच भारतीय सेना अवघ्या 146 धावांवर आटोपली. इंग्लंडकडून रीस टोपलीने ( Bowler Reece Topley ) सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला 100 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला:इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला की, आम्ही सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, पण इंग्लंडचे फलंदाज मोईन आणि विली यांनी संथ खेळी केली. रोहित म्हणाला की खेळपट्टी चांगली असेल असे मला वाटले, पण खेळपट्टीने आम्हाला आश्चर्यचकित केले. एका टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने खेळपट्टीवर तग धरायला हवा होता. जे आम्ही कोणी करू शकलो नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला. आता मँचेस्टरमधला पुढचा सामना रोमांचक असेल, त्यासाठी आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
हेही वाचा -Ultimate Kho Kho Competition : प्रो कब्बडीच्या धर्तीवर पुण्यात अल्टिमेट खो-खो स्पर्धा