नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. विशेषत: तो त्याच्या हेअरस्टाईलबद्दल, नेहमी काही ना काही नवीन करण्याचा त्याचा मानस असतो. तेही कोणतीही मालिका सुरू होण्यापूर्वी आणि पुन्हा एकदा असेच घडले आहे, विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 मालिकेपूर्वी एका नव्या लूकमध्ये दिसणार ( Virat Kohli seen in a new hairstyle ) आहे. आता त्याच्या या नवीन हेअरस्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ( Virat new hairstyle caught attention ) आहे.
कोहलीच्या या नव्या लूकची अनेक छायाचित्रे ऑनलाइन समोर आली आहेत. मुळात, हे फोटो सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट रशीद सलमानीने ( Celebrity Hairstylist Rashid Salmani Shared post ) शेअर केली आहेत, ज्यांनी फोटोंना कॅप्शन दिले आहे की त्याने कोहलीला एक नवीन रूप दिले आहे. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुप्रसिद्ध गायक हार्डी संधूने 'छा गये गुरु' असे लिहिले आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देतान कोहलीला हॉट म्हटले आहे.
कोहलीबद्दल बोलायचे झाले तर आशिया चषकानंतर सर्वांच्या नजरा त्याच्या फलंदाजीवर आहेत. जो आगामी टी-20 विश्वचषकात भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. आशिया चषकापूर्वी कोहली त्याच्या फॉर्मशी झुंजत होता, पण त्याने आशिया चषकात 2 अर्धशतकं आणि 3 वर्षांनंतर एक शतक झळकावत शानदार पुनरागमन केले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत 122 धावांची स्फोटक खेळी खेळली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेवर ( IND vs AUS T20 Series ) असणार नजर -