महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IND vs AUS 1st T20 : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - क्रिकेटच्या लेटेस्ट न्यूज

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या ( IND vs AUS T20 Series ) मालिकेतील पहिला सामना आज मोहालीत खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

IND vs AUS
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

By

Published : Sep 20, 2022, 7:03 PM IST

मोहाली:भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) पहिला टी-20 सामना ( IND vs AUS 1st T20 ) खेळला जाणार आहे. हा सामना मोहालीतील पीसीएच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याल्या रात्री सातला सुरुवात होणार असून दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Australia won the toss and choose bowl first ) आहे.

पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह बाकावरच -

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथम फलंदाजीला जाणार आहे.रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) या संघाचा भाग नसल्याची बातमी भारतीय संघाकडून आली आहे. उमेश यादवला संधी मिळाली आहे, तर हर्षल पटेलनेही पुनरागमन केले आहे. फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहितने नाणेफेक दरम्यान सांगितले की, बुमराह या सामन्यात खेळत नाही, परंतु पुढील दोन सामने खेळेल.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युझवेंद्र चहल

हेही वाचा -ICC T20 Rankings : स्मृती मंधानाने आयसीसी टी-20 क्रमवारीत पटकावले कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान

ABOUT THE AUTHOR

...view details