हैदराबाद: नागपूरच्या ओल्या मैदानामुळे भारताने आठ षटकांचा सामना जिंकून या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. त्यामुळे आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात रविवारी हैदराबाद येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. कर्णधार म्हणून रोहित शर्माला सलग नववी मालिका जिंकण्याची संधी असेल तर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर भारताला दुसऱ्यांदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही संघांना देखील सामना जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांसाठी आजचा सामना करो या मरो'चा असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि तिसरा सामना आज खेळला ( IND vs AUS 3rd T20 ) जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ( Rajiv Gandhi International Cricket Stadium Hyderabad ) हैदराबाद येथे सुरुवात होईल. दोन्ही संघांना काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी आहे. कारण त्यासाठी हैदराबादचे हवामान चांगले असणार आहे. या करो या मरोच्या सामन्याशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
अक्षर मुख्य फिरकीपटू बनण्याच्या मार्गावर निघाला -
रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ( Spinner Axar Patel ) आपली योग्यता सिद्ध केली आहे. तो हळूहळू भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज बनत आहे. त्याने या मालिकेत किफायतशीर गोलंदाजी केली आहे, प्रामुख्याने पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेतल्या आहेत. त्याची खासियत म्हणजे तो एका डावात कधीही गोलंदाजी करू शकतो आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची इकॉनॉमी केवळ 7.1 आहे.
त्याच्या राउंड द विकेट अँगलने तो उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप त्रास देतो. उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध त्याच्या भारतीय कारकिर्दीत अक्षरने 6.2 च्या इकॉनॉमीने 21 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू वेडशिवाय ( Matthew Wade ) दुसरा डावखुरा फलंदाज नाही आणि अशा परिस्थितीत अक्षरकडे विकेट्स वाढवण्याची चांगली संधी आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना अक्षरने या मालिकेत पाच पैकी चार त्रिफळाचित करत बळी घेतले आहेत.
बिग शो झाला फ्लॉप शो -
टी-20 क्रिकेटचा सुपरस्टार ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) जगभरातील लीगमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तथापि, 2020 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी खाली आली आहे. मागील दोन वर्षामध्ये बॅटने त्याची सरासरी 20 च्या खाली होती, या वर्षी तो 21.8 च्या सरासरीने धावा करत आहे. इतकेच नाही तर त्याचा स्ट्राइक रेट 129 आहे जो 2013 नंतर कोणत्याही एका वर्षातील त्याचा सर्वात कमी स्ट्राइक रेट आहे.