मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. हा सामना मंगळवारी (21 सप्टेंबर) झाला, ज्यामध्ये अत्यंत खराब गोलंदाजीमुळे भारताचा 4 विकेट्सनी पराभव ( Australia defeated India by 4 wickets ) झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कचखाऊ गोलंदाजी केली. ज्यामुळे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ), सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या शानदार कामगिरीवर पाणी फेरले गेले.
मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. पण खराब गोलंदाजीमुळे सामना हाताबाहेर गेला. कॅमेरून ग्रीनच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कुठे चूक झाली आणि कुठे सामना फिरला याबद्धल सांगितले ( Rohit Sharma Statement After Match ).
पुढील सामन्यापूर्वी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक -
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा आपल्या गोलंदाजांवर भडकला ( Rohit Sharma angry on bowlers ). यासोबतच संघाची कुठे चूक झाली आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता हेही सांगितले. टीम इंडियाची गोलंदाजी चांगली नसल्याची कबुली रोहितने दिली आहे. संघाने चांगली धावसंख्या उभारली, पण गोलंदाजांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली नाही, असे कर्णधार म्हणाला. पुढच्या सामन्यापूर्वी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्ही मोहालीला आलो तेव्हा आम्हाला माहित होते की, इथे मोठ्या स्कोअरचा सामना होणार आहे.
'200 धावा करूनही तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाही'- रोहित शर्मा