महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Income Tax Raid On Abu Azmi : अबू आझमींच्या निकटवर्तीयांवर टाकलेल्या छाप्यात सापडलं 'मोठं' घबाड, विनायक ग्रुपची 250 कोटीची मालमत्ता जप्त

Income Tax Raid On Abu Azmi : काशीतील अबू आझमी यांची भागीदारी असलेल्या विनायक ग्रुपच्या आस्थापनांवर आयकर विभागानं छापेमारी सुरू केलीय. या छाप्यात आयकर विभागाला 250 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली आहे. या प्रकरणी पथकांनं 42 फ्लॅट जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Income Tax Raid On Abu Azmi
Income Tax Raid On Abu Azmi

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 1:00 PM IST

वाराणसीIncome Tax Raid On Abu Azmi :वाराणसी, मुंबईसह सपा नेते अबू आझमी यांच्या अनेक ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. गेल्या गुरुवारपासून आयकर विभागाची टीम वाराणसीत तैनात आहे. यावेळी प्राप्तिकर पथकानं विनायक प्लाझामधील एक मजला जप्त केला असून कोट्यवधींची बेनामी मालमत्ताही उघड केली आहे. यासोबतच तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी कंपनीची अनेक खाती जप्त केली आहेत. आणखी अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या काळात सुमारे 250 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचा पर्दाफाश झाल्याची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागानं टाकलेल्या छापेमारीशी माझा कोणताही संबंध नाही. ही छापेमारी आमच्या भागीदारांवर करण्यात येत आहे. आयकर विभागानं आमच्या मुंबईतील कोणत्याही मालमत्तेवर छापेमारी केली नाही. अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

विनायक ग्रुपची कागदपत्रे स्कॅन : मुंबई, लखनऊच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर आयकर विभागाचं पथक वाराणसीला पोहोचलंय. अबू आझमीच्या मालमत्तांचा शोध घेऊन जप्तीची कारवाई केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनायक ग्रुपनं वाराणसीमध्ये अनेक शॉपिंग सेंटर्स, इमारती, मॉल, बहुमजली निवासी इमारती बांधल्या आहेत. यामध्ये वाराणसीच्या मालदहिया, पिपलानी कटरा, सेंट्रल जेल रोड इत्यादी भागातील निवासी, व्यावसायिक बहुमजली इमारतींचा समावेश आहे. आयकर विभागाच्या पथकानं मालदहिया येथील विनायक प्लाझा, मध्यवर्ती कारागृह रोडवरील वरुणा गार्डनसह शहरातील अनेक ठिकाणी तपासणी केली.

250 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्ती :अबू आझमी यांच्या जवळच्या विनायक ग्रूपवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या कालावधित तपास पथकानं शेकडो कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. तर वरुणा गार्डनमधील 42 फ्लॅट, विनायक प्लाझाचे दोन मजले जप्त करण्यात आले आहेत. आयकर पथकानं जप्त केलेल्या मजल्यांवर, फ्लॅटवर नोटिसा चिकटवल्या आहेत. यासोबतच तपास पथकानं सुमारे 250 कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीचा खुलासा केला आहे. अधिकाऱ्यांनी सी टॉवरचे दोन मजले जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. यासोबतच ज्या खात्यांमध्ये व्यवहारात फेरफार झाल्याचा संशय आला आहे, त्या सर्व खात्यांवरही आयकर विभागानं कारवाई केली आहे.

बोगस कंपन्यांकडून कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदी : अबू आझमी यांनी कोलकात्यातील विविध भागात बोगस कंपन्यांच्या नावानं कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचं तपास पथकाला आढळून आलं आहे. मालदहिया येथील विनायका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात बाबतपूर, वजीरपूर येथील 4 एकरहून अधिक जमीन असल्याची माहिती मिळाली. कार्यालयात सापडलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्थितीत विनायका कन्स्ट्रक्शन कंपनीची सर्व बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. त्याचा अहवाल मुख्यालयाला पाठवला जाईल, त्याआधारे कारवाई केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

अनेक कागदपत्रे जप्त : विनायक ग्रूपनं मालदहिया, पिपलानी कटरा, सेंट्रल जेल रोड इत्यादी भागात निवासी, व्यावसायिक बहुमजली इमारती बांधल्या आहेत. मालदहिया येथील विनायक प्लाझा, सेंट्रल जेल रोडवरील वरुणा गार्डन, शहरातील अनेक ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप, बँक खाती, जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रं, बँक लॉकरशी संबंधित कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत.

करचुकवेगिरीचा आरोप : वाराणसीला पोहोचलेली टीम मुंबईतील कुलाबात आझमी यांच्या जागेवर छापे टाकण्यात आले. आझमी यांचे सहकारी अनीस व्यवसायाचे संपूर्ण काम पाहत होते. अनीसच्या संगनमतानं ते मुंबईत हवालाद्वारे पैशांचा व्यवहार करत असे, असा आरोप आहे. आझमी यांनी 2018-2022 या कालावधीत 200 कोटी रुपयांची कमाई केल्याचा आयकराचा आरोप आहे. या कालावधीत त्यांचं 160 कोटी रुपयांचं उत्पन्न उघड झालंय. आझमी यांच्यावर हवालाद्वारे 40 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे.

'या' अधिकाऱ्यांचा समावेश :वाराणसीला पोहोचलेल्या इन्कम टॅक्सच्या टीमसोबत वाराणसीची टीमही हजर होती. यावेळी अबू आझमीच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तपास पथकात प्रधान संचालक तपास मीता सिंह, अतिरिक्त संचालक अन्वेषण, अनामी युनिटचे आयुक्त ध्रुव पुरारी सिंग, उपसंचालक-1 तपास आलोक सिंग, उपसंचालक बेनामी युनिट सुधाकर शुक्ला, आयकर अधिकारी जेपी चौबे, आयकर अधिकारी अजय श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Abu Azami IT Raid : अबू आझमींच्या मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी, अबू आझमी म्हणाले...
  2. Abu Azmi Received Threat : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींना धमकी, तीन दिवसात मारणार असल्याची व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावले
  3. Abu Azmi Criticize on Government : हिंदू व्होट बॅंकेसाठीच माहीमच्या मजारीवर कारवाई : अबू आझमी यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details