महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Income Tax Raid in Tamil Nadu : तामिळनाडूत आयकर विभागाचं धाडसत्र, मंत्री ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित 80 ठिकाणी छापेमारी - अरुणाई कॉलेज ऑफ इंजिनियरिंग

Income Tax Raid in Tamil Nadu : तामिळनाडूचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित ठिकाणी आयकर अधिकारी छापे टाकत आहेत. तिरुवण्णमलाई येथील घर, कार्यालय, नातेवाईकांचे घर, कंत्राटदाराचे घर आणि कार्यालयांसह ठिकठिकाणी त्यांची झडती घेण्यात आली.

Income Tax Raid in Tamil Nadu
Income Tax Raid in Tamil Nadu

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 11:14 AM IST

चेन्नई Income Tax Raid in Tamil Nadu :तामिळनाडूतील आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी राज्याचे मंत्री ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केलीय. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. सुत्रांनी सांगितलं की, चेन्नईसह राज्यातील विविध भागात शोधमोहीम सुरू आहे. तामिळनाडूतील एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात डीएमकेचे ज्येष्ठ नेते वेलू यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे.

80 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापोमारी : शुक्रवारी सकाळपासून आयकर अधिकारी त्यांच्या घरांवर आणि त्यांच्याशी संबंधित 80 ठिकाणी छापे टाकले आहेत. वेलू यांच्या मालकीच्या 80 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मंत्री ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील करचुकवेगिरीच्या तक्रारींच्या आधारे सकाळी 6 वाजल्यापासून 80 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. तिरुवन्नमलाईमध्ये आयकर विभागाचे अधिकारी मंत्री ईव्ही वेलू यांचे घर, शैक्षणिक संस्था, बांधकाम कंपन्या आणि रुग्णालयासह सर्व ठिकाणी छापे टाकत आहेत. याप्रकरणी 30 हून अधिक आयकर अधिकारी थियागराया नगर, किलपक्कम, माउंट रोड, वेपेरी, अण्णा नगर आणि चेन्नईमधील इतर ठिकाणी आणि त्यांचं घर, अरुणाई कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, अरुणाई मेडिकल कॉलेज, तिरुवन्नामलाई येथील कार्यालयं आणि ट्रस्टवर छापे टाकत असल्याची माहिती आहे.

2021 मध्येही केली होती छापोमारी : यापूर्वी 2021 मध्येदेखील प्राप्तिकर विभागानं मंत्री ईव्ही वेलू यांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या कागदपत्रांच्या आधारे पुन्हा तपासणी केली जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आयकर अधिकाऱ्याकडून ईव्ही वेलू, त्याचा भाऊ, मुलगा, मुलगी आणि इतर संबंधित कंपन्यांच्या मालकीच्या कंपन्यांचीही चौकशी करत आहेत.

40 हून अधिक कारमधून आले अधिकारी : सार्वजनिक बांधकाम विभाग, इमारत आणि महामार्ग विभागाच्या कंत्राटदारांच्या 40 कार्यालयांमध्ये ही तपासणी सुरू असल्याचं समोर आलंय. बांधकाम कंपन्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या कासा ग्रांडेसह कंपन्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. छापा टाकलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी प्राप्तिकर विभागानं केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) मदत घेतलीय. चेन्नईसह विविध जिल्ह्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी 40 हून अधिक कारमधून बाहेर आले आहेत. मंत्री ईव्ही वेलू यांच्याशी संबंधित ठिकाणी तपास सुरू आहे. याचा तपशील प्राप्तिकर अधिकारीनंतर जाहीर करणार आहेत. अलीकडील काळात केंद्रीय एजन्सीनं तामिळनाडू राज्य सरकारच्या मंत्र्यांवर ताशेरे ओढत आहेत. तामिळनाडू सरकारचे अनेक मंत्री ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. याबाबत राज्य सरकारच्या मंत्र्यांनी अनेकदा आक्षेपही घेतलाय. केंद्रीय यंत्रणांची कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केलाय.

हेही वाचा :

  1. 42 Crore Cash Recovered : कर्नाटकात राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरी सापडली '25 खोके' रोकड
  2. IT Raid on G-Square : मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या संबंधितांवर छापा टाकण्यास का कचरती आयकर विभाग?
  3. IT Raid Telangana: तेलंगणाच्या मंत्र्याच्या हैदराबाद येथील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने टाकले छापे

ABOUT THE AUTHOR

...view details