महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : दांडीनंतर ओडिशातील इंचुडी इथेही झाला होता मिठाचा सत्याग्रह, जाणून घ्या सविस्तर... - ओडिशा इंचुडी

ओडिशाच्या इंचुडी या गावातील हे शांती स्तूप आणि स्मृती पीठ आपल्याला या गावाच्या मीठाच्या सत्याग्रहातील महत्वाच्या भूमिकेची आठवण करून देते. महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर आचार्य हरिहर दास, गोपालबंधू चौधरी आणि हरेकृष्ण महातब यांच्या नेतृत्वात अनेक सत्याग्रही कटकमधील स्वराज आश्रमातून पायी यात्रेला निघाले. 12 एप्रिल 1930 रोजी ते बालासोरला पोहोचले आणि 13 एप्रिलला त्यांनी इंचुडी इथे मिठाचा कायदा मोडला. यावेळी ब्रिटिशांनी काही सत्याग्रहींना अटक केली, तर लाठीमारात अनेक सत्याग्रही जखमी झाले. मिठावर प्रक्रियेसाठी लागणारी मातीची भांडीही ब्रिटिशांनी यावेळी फोडली.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : दांडीनंतर ओडिशातील इंचुडी इथेही झाला होता मिठाचा सत्याग्रह, जाणून घ्या सविस्तर...
स्वातंत्र्याची 75 वर्षे : दांडीनंतर ओडिशातील इंचुडी इथेही झाला होता मिठाचा सत्याग्रह, जाणून घ्या सविस्तर...

By

Published : Aug 21, 2021, 6:03 AM IST

बालासोर : ओडिशाच्या इंचुडी या गावातील हे शांती स्तूप आणि स्मृती पीठ आपल्याला या गावाच्या मीठाच्या सत्याग्रहातील महत्वाच्या भूमिकेची आठवण करून देते. महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर आचार्य हरिहर दास, गोपालबंधू चौधरी आणि हरेकृष्ण महातब यांच्या नेतृत्वात अनेक सत्याग्रही कटकमधील स्वराज आश्रमातून पायी यात्रेला निघाले. 12 एप्रिल 1930 रोजी ते बालासोरला पोहोचले आणि 13 एप्रिलला त्यांनी इंचुडी इथे मिठाचा कायदा मोडला. यावेळी ब्रिटिशांनी काही सत्याग्रहींना अटक केली, तर लाठीमारात अनेक सत्याग्रही जखमी झाले. मिठावर प्रक्रियेसाठी लागणारी मातीची भांडीही ब्रिटिशांनी यावेळी फोडली.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : दांडीनंतर ओडिशातील इंचुडी इथेही झाला होता मिठाचा सत्याग्रह, जाणून घ्या सविस्तर...

दांडीनंतर इंचुडीचे दुसरे स्थान

दांडीनंतर इंचुडीचे दुसरे स्थान असल्याचे मानले जाते असे गांधीवादी कार्यकर्ते सर्वेश्वर दास यांचे म्हणणे आहे. आचार्य हरिहर आणि गोपालबंधू चौधरी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सत्याग्रही यात सहभागी झाले होते. रमादेवी, मालती चौधरी, सुभद्रा महातब, कोकिळा देवी आणि चंद्रमणी देवी यांनीही मीठ सत्याग्रहात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या स्वतःच्या साडीतून कांतापाडाहून निलगिरी इथे मीठ विकण्यासाठी घेऊन गेल्या होत्या असे दास यांनी सांगितले. तर इतिहास अभ्यासक डॉ. अरविंद गिरी यांच्या मते इंचुडी येथील मीठाचा सत्याग्रह ओडिशाची दांडी म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधींच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने आलेल्या सत्याग्रहींचे नेतृत्व गोपालबंधू चौधरींनी केले होते. कटकहून पायी आलेल्या चौधरींना ताब्यात घेतल्यानंतर आचार्य हरिहर यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केल्याचे गिरी म्हणाले.

दांडी यात्रेनंतर सर्वात मोठा मिठाचा सत्याग्रह

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेनंतरचा सर्वात मोठा मिठाचा सत्याग्रह म्हणून इंचुडी सत्याग्रहाकडे बघितले जाते. जिथे मिठाचा कायदा मोडण्यात आला ते ठिकाण स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष देते. इथे एक स्मारक उभारण्यात आले असले तरी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी इतर काहीही ठोस काम करण्यात आलेले नाही. सत्याग्रहींच्या आठवणी समुद्रातील धूप आणि अतिक्रमणामुळे नष्ट होत आहेत. 2003 मध्ये हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असले तरी, योग्य पद्धतीने प्रसिद्धी होत नसल्याने खूपच कमी प्रमाणात पर्यटक इथे येतात.

ग्रामस्थांना वाटते वारसा जपला पाहिजे

इंचुडी येथील ग्रामस्थ श्रीकांत बरीक यांच्या सांगण्यानुसार सतीपाडा इथे मिठावर प्रक्रिया केली जायची. मात्र सध्या इथे मच्छिमारांनी अतिक्रमण केले आहे. इथला मीठ स्मारक स्तंभ समुद्राची धूप झाल्याने जीर्ण झाला आहे. हे स्मारक अत्यंत दुर्लक्षित आहे. हा वारसा जतन करण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने हवेतच विरून गेली आहेत. हा वारसा जतन केला पाहिजे असे बरीक यांना वाटते.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष

या वर्षीच्या सुरूवातीला 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. 12 मार्च पासून या उपक्रमाला सुरूवात झाली. यात नागरिकांनी उत्स्फुर्तफणे सहभाग घेण्याचे आवाहन मोदींनी केले. हा महोत्सव लोकचळवळ म्हणून सरकारद्वारे साजरा केला जात आहे. एक दिवस देशभक्तीच्या उत्सवासाठी लोक सत्याग्रह स्मृती पीठाला भेट देतील. मात्र उर्वरित वर्षभरासाठी हे वैभवशाली इतिहासाचे स्मारक पुन्हा विस्मरणात जाईल. इंचुडी हे सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणादायी ठिकाण आहे मात्र अजूनही त्याला राष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या महान खुदीराम बोस यांची शौर्यगाथा!

ABOUT THE AUTHOR

...view details