लखनौ (उत्तरप्रदेश) - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आगामी उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तब्बल 40 टक्के महिलांनी तिकीट देणार असल्याचे प्रियंका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका कांधी यांनी आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये 40 टक्के महिलांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे चित्र बदलण्यासाठी महिलांना तिकीट देण्याचा निर्णय-
उत्तर प्रदेशचा विकास व्हावा व राज्यात बदल व्हावा, असे वाटते अशा महिलांसाठी हा निर्णय आहे. महिलांना राजकारणात पूर्ण स्थान दिले जाणार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 2019 च्या निवडणुकी दरम्यान आल्यानंतर अलाहाबाद विद्यापीठामधील काही मुली भेटल्या होत्या. हॉस्टेलमध्ये मुले आणि मुलींसाठी वेगळे कायदे असल्याचे त्यांनी सांगितले होते. गंगा यात्रेच्या दरम्यान काही मुलींनी गावात शाळा नसल्याचे सांगितले होते. त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. प्रयागराजमधील पारो या मुलीने हात पकडून नेता होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी हा निर्णय आहे.
हेही वाचा-रणजीत सिंह खून प्रकरण: बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
शक्य असते तर महिलांना 50 टक्के दिली असती संधी
पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या, की सर्वसामान्यांचे कुणीही रक्षण करत नाही. सत्तेच्या नावाने हे लोकांना हे चिरडतात. सगळीकडे द्वेष सुरू आहे. महिला हे चित्र बदलू शकतात. राजकारणात माझ्या खांद्याला खांदा लावून या, असे आवाहनही गांधी यांनी केले. काँग्रेसच्या महासचिव पत्रकार परिषदेत म्हणाल्या, की आम्ही अर्जाची मागणी केली आहे. पुढील 15 तारखेपर्यंत तिकीटासाठी अर्ज करता येणे शक्य आहे. हे तिकीट महिलांना मेरिटच्या आधारावर दिले जाणार आहे. शक्य असते तर 40 टक्के ऐवजी 50 टक्के महिलांना तिकीट दिले असते.
हेही वाचा-सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला
प्रियंका गांधींनी महिला पोलिसांचाही केला उल्लेख
सीतापूरमध्ये महिला पोलिसांनी मला घेरले होते. तेव्हा दोन महिला पोलिसांनी सीतापूरमधील पीएसी गेस्ट हाऊसमध्ये नेले. हा निर्णय त्यांच्यासाठी आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका पुढे म्हणाल्या, की देशाला धर्माच्या राजकारणातून बाहेर पडायचे आहे. देशाला पुढे न्यायचे आहे. हे काम महिलांना स्वत: करावे लागणार आहे.
हेही वाचा-Aryan drug case: एनसीबी मोतिहारी कारागृहात बंद असलेल्या मुंबईच्या 2 तस्करांची घेणार रिमांड
निवडणूक लढविण्याबाबत विचार नाही-
प्रियंका गांधींनी निवडणूक लढविण्यावरही मत व्यक्त केले. निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतला नाही. पुन्हा विचार करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणुकीत उतरणार का? असे विचारले असता प्रियंका यांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.