हैदराबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीशी असलेली महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी ( Shivsena Rebel MLAs ) एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) नेतृत्वाखाली बंड पुकारले आहे. या बंडखोर आमदारांची व्यवस्था गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ( Radison Blu Hotel Guwahati ) करण्यात आली आहे. या सर्व राजकीय नाट्ट्यात आमचा हात नसल्याचे भाजपचे नेते म्हणत असले तरी बंडखोरांना असलेला भाजपचा सपोर्ट काही लपून राहिलेला ( BJP Supports Shivsena Rebel MLAs ) नाही. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( assam cm himanta biswa sarma ) यांचे खासमखास असलेले पाच नेते याच हॉटेलमध्ये तळ ठोकून बंडखोरांची खातिरदारी करत आहेत. जाणून घेऊयात या पाच नेत्यांविषयी..
आसामचे मुख्यमंत्री दिल्लीतून फिरवताहेत सूत्र : महाराष्ट्रातील ४५ हुन अधिक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये आलेले असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे या बंडखोरांना भेटण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हिमंता हे दिल्लीत बसून गुवाहाटीतील सूत्र फिरवत आहेत. हिमंता यांनी आसाममधील त्यांच्या खास लोकांवर ही जबाबदारी सोपवली असून, बंडखोर आमदार गुवाहाटीत आल्यापासून त्यांची खातिरदारी केली जात आहे.
आणखी आमदार सहभागी होण्याची शक्यता :गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा (42 rebel MLAs from Maharashtra) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत असल्याचे दिसून आले. यामध्ये आज आणखी काही आमदार सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.