नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 9 जुन)रोजी सांगितले, की त्यांचे सरकार देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व क्षेत्रांना बळकट करण्यावर विश्वास ठेवते. पूर्वीच्या सरकारच्या निवडक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होते आणि इतर मुद्यांकडे दुर्लक्ष होते अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे. दोन दिवसीय बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची 'जैव-अर्थव्यवस्था' गेल्या आठ वर्षात US$ 10 अब्ज वरून US$ 80 अब्जपर्यंत आठ पटीने वाढली आहे असा दावाही त्यांनी केल आहे.
ते म्हणाले की, जैवतंत्रज्ञानाच्या जागतिक परिसंस्थेत भारत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवण्यापासून फार दूर नाही. ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत देशातील स्टार्टअप्सची संख्या काहीशेवरून ७०,००० वर पोहोचली आहे आणि हे ७०,००० स्टार्टअप्स सुमारे ६० विविध उद्योगांतील आहेत. ते म्हणाले, की यामध्ये 5,000 हून अधिक स्टार्ट अप्स बायोटेक क्षेत्राशी निगडीत आहेत. तसेच, हे शक्य झाले त्याचे कारण सरकारने व्यवसाय करणे, तसेच देशातील उद्योजकता बळकट करण्याच्या दिशेने काम केले आहे असही ते म्हणाले आहेत.
काही क्षेत्रांतील निर्यातीतील विक्रमी वाढीचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या प्रत्येक क्षेत्राला पाठिंबा देणे आणि त्यांचा विकास करणे ही देशाची गरज आहे. सरकार देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शक्यतांचा शोध घेत आहे. ते म्हणाले की, देशाच्या विकासाला गती देण्यासाठी बायोटेक क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. "आमच्या तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या कौशल्यांवर आणि नवकल्पनांवर जगाचा विश्वास एका उंचीवर आहे. तसेच, ते म्हणाले की, भारतातील बायोटेक क्षेत्र आणि भारतातील जैव व्यावसायिकांसाठी हा विश्वास आणि तीच विश्वासार्हता या दशकात आपण पाहत आहोत.