महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Corona Cases in India : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद, 41 जणांचा मृत्यू - corona patients death india

देशात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत ( Corona Cases in India ) आहेत. दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा ( Corona patients registered in india ) ही आकडेवारी कमी असली तरी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

corona patients registered in india
कोरोना रुग्णसंख्या भारत

By

Published : Jul 25, 2022, 10:23 AM IST

हैदराबाद -देशात सध्या कोरोनाचे रुग्ण ( Corona Cases in India ) वाढत आहेत. दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा ही आकडेवारी कमी ( Corona patients registered in india ) असली तरी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 18 हजार 148 रुग्ण बरे झाले असून 41 लोकांनी आपला जीव ( Corona patients death india ) गमावला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 877 असून पॉझिटिव्हिटी रेट हा 7.03 टक्के इतका आहे.

हेही वाचा -Arpita Mukherjee Car Accident : अर्पिता मुखर्जींच्या ताफ्याला कारची धडक, अपघातात किरकोळ जखमी

गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवे रुग्ण आढळल्याने देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 39 लाख 5 हजार 621 इतकी झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटातून पुढे आले आहे. तसेच, 41 रुग्णांचा मृत्यूने एकूण मृतांची संख्या ही 5 लाख 26 हजार 74 इतकी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत केरळ आघाडीवर असून तेथे 2 हजार 21 नवे रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रत हा आकडा 2 हजार 15 इतका आहे.

महाराष्ट्रात 2 हजार 15 रुग्णांची नोंद -महाराष्ट्रात 2 हजार 15 नवे कोरोना रग्ण आढळल्याची माहिती काल समोर आली होती. 6 लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांची एकूण संख्या ही 82 लाखांच्या वर गेली आहे. तसेच, राज्यातील मृतांची संख्या ही 1 लाख 48 हजार 62 इतकी झाली आहे. 1 हजार 916 रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ही 78 लाखांच्या वर आहे. रिकवरी रेट 97.97 टक्के इतका आहे.

मुंबईत काल 238 नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. काल २३८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २०१ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

२३८ नवे रुग्ण -काल २ मृत्यूंची नोंद झाली आहे. २७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २२ हजार ९१२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १ हजार ४५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८१७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ९५४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२४ टक्के इतका आहे.

हेही वाचा -Kanwariyas protest: यमुनानगरमध्ये कारने धडक दिल्याने कावड धारकांनी कारवर काढला राग, मोडतोड करुन दिली पेटवून

ABOUT THE AUTHOR

...view details