रतलाम :शहरालगतच्या एका गावातील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाकडून मुलींना मारहाणीचे घटना समोर आली आहे. केवळ पाढे येत नसल्याने येथील शिक्षकाने मुलींना मारहाण ( Teacher Brutally Beat Girls ) केली. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ( Video Viral On Social Media ) आहे. एक एक करून शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली. शिक्षकाने मुलांना एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली आहे की, ते पाहणाऱ्याला संताप येतो. मुलांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव जिनेंद्र मोगरा असे आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण :ही घटना सरकारी कन्या प्राथमिक शाळेतील आहे. शहराजवळ पिपलोडा विकास गट असून, ममतखेडा येथे मुलींची शाळा आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, शिक्षक मुलांना एक-एक करून आपल्याकडे बोलावतो आणि नंतर त्यांना पाढे वाचायला सांगतो. पाढे वाचता न आल्याने या चिमुकल्या मुलींना या शिक्षकाने बेदरकारपणे मारले.