नवी दिल्ली: भारतात शनिवारी कोरोनाचे 1 लाख 27 हजार 952 नवे रुग्ण (Corona New Patient ) नोंदवले गेले आहेत. जे कालच्या तुलनेत 14% कमी आहेत. मात्र गेल्या 24 तासांत 1059 रुग्णांचा (India Corona death ) मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 30 हजार 814 रुग्ण बरे झाले असून पाॅझिटिव्हीटी रेट 7.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 कोटी 2 लाख 47 हजार 902 वर पोहोचला आहे.
24 तासातील 1,059 मृत्यूंसह एकूण मृतांचा आकडा 5 लाख 1 हजार 114 वर पोहोचला आहे. देशातील एकूण संसर्गांपैकी ३.१६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 1लाख 03 हजार 921 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95.64 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाॅझिटिव्हीटी रेट 7.98 टक्के नोंदविला गेला, तर साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी रेट 11.21 टक्के नोंदविला गेला आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4 कोटी 02 लाख 47 हजार 902 वर पोहोचली आहे. यात मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आतापर्यंत, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात प्रशासित केलेले एकत्रित डोस 168.98 कोटींहून अधिक झाले आहेत.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला. भारताने 4 मे 2021 रोजी दोन कोटी आणि 23 जून रोजी तीन कोटींचा गंभीर टप्पा पार केला. शुक्रवारी, गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 49 हजार 394 नवीन कोरोना रुग्णांसह 1,072 नवीन मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूची संख्या पाच लाखांवर गेली. देशातील मृतांची संख्या 5लाख 055 इतकी आहे. 1 लाख 42 हजार 859 मृत्यूंसह, महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे, त्यानंतर केरळ (56,701), कर्नाटक (39,197), तामिळनाडू (37,666), दिल्ली (25,932) आणि उत्तर प्रदेश (23,277) आहेत.