विजयनगरम (आंध्र प्रदेश) : जीएमआरआयटीच्या रौप्यमहोत्सवी समारंभात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) म्हणाले की, भारतात वास्तविकतेचा अर्थ भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते आणि प्रदूषण हे आहे. (in india reality means corruption dirty roads). मात्र सिंगापूरमध्ये याचा अर्थ स्वच्छ रस्ते आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कशाच्याही अभावाकडे बदलाची संधी म्हणून पाहिली पाहिजे. कोणीही दुसऱ्या कोणीतरी बदल घडवून आणण्याची वाट पाहू नये. (Narayana Murthy at GMRIT).
तरुणांवर नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी : एन.आर नारायण मूर्ती म्हणाले की, वास्तव हे 'तुम्ही बनवता ते' आहे. संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात नारायण मूर्ती यांनी उद्धृत केले की, "हे नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तरुणांनी समाजात बदल घडवून आणण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक, समाज आणि राष्ट्राचे हित जपायला शिकले पाहिजे". या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी कंपनीचे अध्यक्ष म्हणून आपली सर्वात मोठी खंत उघड केली. संस्थापकांच्या मुलांना कंपनीच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेत सहभागी करून घेऊ नये हे चुकीचे असल्याचे मूर्ती म्हणाले. नेक्स्ट जनरेशन प्रमोटर ग्रुपला इन्फोसिसच्या बाहेर ठेवणे चुकीचे असल्याचे मूर्ती म्हणाले.