महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Flood Situation in Assam : आसाममधील पुराचा 7 लाख लोकांना फटका; तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी - आसाममधील पुराचा 7 लाख लोकांना फटका

एसडीएमएने दिलेल्या अहवालात ( ASDMA  report on Assam flood situation ) असे म्हटले आहे की आसाममधील 27 जिल्ह्यांना अजून पुराचा फटका बसत आहे. 75 मंडळांमध्ये 1790 गावे वर्षाच्या पुरात बुडाली ( 790 villages submerged in the first flood ) आहेत. एकूण 7.17 लाख लोक पुरग्रस्त आहेत. ही संख्या हळूहळू वाढत आहे. आसाम सरकारने 359 पूर शिबिरे उघडली आहेत.

आसाममधील पूरस्थिती
आसाममधील पूरस्थिती

By

Published : May 20, 2022, 7:07 PM IST

गुवाहाटी - आसाममधील पूरस्थिती अजूनही ( flood situation in Assam ) सुधारलेली नाही. कोपिली, डिसांग आणि ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीच्यावर ( Brahmaputra flowing above the danger level ) वाहत आहेत. मध्य आसाममधील कोपिली नदी सर्वोच्च पूर पातळीच्यावर वाहत ( Kopili river flood ) आहे. जी नागाव आणि होजई जिल्ह्यांमध्ये विनाशकारी पुर निर्माण झाला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की होजईमध्ये पूर घरांच्या छतावरून वाहत आहे.

एसडीएमएने दिलेल्या अहवालात ( ASDMA report on Assam flood situation ) असे म्हटले आहे की आसाममधील 27 जिल्ह्यांना अजून पुराचा फटका बसत आहे. 75 मंडळांमध्ये 1790 गावे वर्षाच्या पुरात बुडाली ( 790 villages submerged in the first flood ) आहेत. एकूण 7.17 लाख लोक पुरग्रस्त आहेत. ही संख्या हळूहळू वाढत आहे. आसाम सरकारने 359 पूर शिबिरे उघडली आहेत. त्यापैकी 167 मदत शिबिरे आणि 192 मदत वितरण केंद्रे आहेत. अहवालानुसार, 80,298 लोक अजूनही मदत शिबिरात आहेत.

नदी धोक्याच्या पातळीच्यावर

नागाव जिल्ह्यातील कांपूर परिसरात गुरुवारी पुरात दोन जणांचा मृत्यू झाला. पूरग्रस्त भागात एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कर/निमलष्करी दल आणि स्थानिक लोक देखील बचाव कार्यात मदत करत आहेत.

आसाममधील पुराचा 7 लाख लोकांना फटका

ABOUT THE AUTHOR

...view details