महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Imran Khan Marriage Case: इम्रान खानने तिसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून दुसऱ्या पत्नीला दिला होता घटस्फोट - पीटीआयचे माजी नेते अवान चौधरी

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे माजी नेते अवान चौधरी यांनी गुरुवारी आरोप केला की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची सध्याची पत्नी बुशरा बीबीच्या सांगण्यावरून त्यांची दुसरी पत्नी रेहम खानला घटस्फोट दिला. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

Imran Khan Marriage Case
Imran Khan Marriage Case

By

Published : May 4, 2023, 10:35 PM IST

इस्लामाबाद : एका धक्कादायक खुलाशामध्ये, माजी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते अवान चौधरी यांनी गुरुवारी आरोप केला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची सध्याची पत्नी बुशरा बीबीच्या सांगण्यावरून त्यांची दुसरी पत्नी रेहम खानला घटस्फोट दिला आहे. इम्रान यांची बुशरा रियाझ वॅट सोबतच्या कथित गैर-इस्लामी निकाहशी संबंधित इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात कार्यवाही प्रलंबित आहे, असे जिओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे मित्र झुल्फी बुखारी आणि पक्षाचे माजी नेते अवान चौधरी म्हणाले की, ते खान यांचे स्वीय सहाय्यक आणि राजकीय सचिव आहेत. ते म्हणाले, इम्रान खान यांचे सर्व वैयक्तिक आणि राजकीय व्यवहार मी पाहत असे.

निकाह'शी संबंधित सत्र न्यायालयात कार्यवाही : इम्रान खानने फेब्रुवारी २०१८ मध्ये बुशरा (जी त्याची तिसरी पत्नी)शी लग्न केले होते. इम्रान यांचे मित्र झुल्फी बुखारी आणि पक्षाचे माजी नेते अवान चौधरी यांनी सांगितले की, मुफ्ती सईद यांनी लाहोरमध्ये लग्न केले होते. ते दोघेही त्यावेळी लग्नाचे साक्षीदार होते. बुशरा ही इम्रानची तिसरी पत्नी आहे. बुशरा रियाझ वॅट (बुशरा बीबी म्हणून ओळखले जाते) यांच्यासोबत पीटीआयच्या कथित गैर-इस्लामी 'निकाह'शी संबंधित इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात कार्यवाही प्रलंबित आहे, असे जिओ न्यूजच्या वृत्तानुसार उघड झाले. इम्रान खानने फेब्रुवारी २०१८ मध्ये बुशराशी लग्न केले.

2015 मध्ये घटस्फोट झाला : न्यायालयाला सांगितले की, खान आणि रेहम यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, बुशरा बीबीने इम्रान खानला रेहम खानला तत्काळ घटस्फोट देण्यास सांगितले. त्यावेली ते तीच्या फायद्याचे होते. बुशरा बीबीच्या सल्ल्यानुसार खानने रेहमला ईमेलद्वारे घटस्फोट दिला. अवान म्हणाले की, खानची माजी पत्नी त्यावेळी पाकिस्तानात नव्हती.

घटस्फोटानंतर अस्वस्थ :घटस्फोटानंतर खान व्यथित झाला आणि अनेकदा बुशरा बीबीकडे नेण्यास सांगितले, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर, खान 31 डिसेंबर 2017 पर्यंत बुशरा बीबीला भेटत राहिला आणि 1 जानेवारी 2018 रोजी तिच्याशी लग्न करणार असल्याची घोषणा केली. इम्रान खानच्या बोलण्याने मी आश्चर्यचकित झालो. बुशरा बीबी आधीच विवाहित होती. परंतु, इम्रान खानने मला सांगितले की बुशरा बीबी घटस्फोटित आहे. त्यानंतर बुशरा बीबीसोबत इम्रान खानचा विवाह 1 जानेवारी 2018 ला लाहोरमध्ये संपन्न झाला.

हेही वाचा :Anil Dujana Killed In Encounter: यूपी एसटीएफची मोठी कारवाई! कुख्यात गुंड अनिल दुजाना एनकाउंटरमध्ये ठार

ABOUT THE AUTHOR

...view details