पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून गुजरात ( Top News Today) दौरा -पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौरा सुरू होणार आहे. आज मोदींच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45 वाजता देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सूर्य मंदिराला भेट (PM Narendra Modi Gujarat visit )देतील.
शिंदे ठाकरे गटाकडून बैठकीचं आयोजन -निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक नि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरदुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे.. दरम्यान, सोमवारी पक्ष चिन्हाचा आणि नावाचा निर्णय होणार (News stories of national and local importance) आहे.
आज कोजागरी पौर्णिमा -कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते. आ कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात.