शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज जयंती आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे स्मृतीस्थळ शिवाजी पार्कला भेट देऊन आदरांजली वाहतील. यानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये येणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण -
बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी (दि.२३) होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात राष्ट्र्रवादीचे प्रमुख शरद पवार, मनसे अध्यक्ष व बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
राजपथावर संचलनाची रंगीत तालीम -
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर यंदा 32 चित्ररथ दिसणार आहेत. सुरक्षा मंत्रालयामार्फत राष्ट्रीय रंगशाळा शिबीर, नवी दिल्ली येथील विविध राज्यांच्या चित्ररथांची झलक माध्यमांसमोर सादर केली आहे. 23 जानेवारीला राजपथावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आपापल्या राज्यांची सांस्कृतिक झलक माध्यमांसोर सादर करण्यात आली आहे.
जागतिक हस्ताक्षर दिन -
23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.हस्ताक्षरामुळे स्वतःचे वेगळेपण सिद्ध होतेच पण हस्ताक्षरामुळे संयम आणि जगण्यात शिस्त ही लागते,पेनने लिहता वेळी बोटांची होणारी हलचाल ह्यामुळे भाषा प्रभुत्वाच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असं मानस शास्त्रीय सिद्ध झालं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे आज होणार हलवा समारंभ -
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. मात्र, छपाईपूर्वी पंरपरेप्रमाणे होणारा हलवा आज (शनिवारी) समारंभ होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.