महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर - भाजपाचे वीज बिलाविरोधात आंदोलन. शिवसेनेचे पेट्रोल दर वाढीवर आंदोलन

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

NEWS
HGG

By

Published : Feb 5, 2021, 6:53 AM IST

  • वाढीव वीज बिलावरून भाजपचे आज राज्यात आंदोलन
    भाजपा आंदोलन

थकीत वीज बिल भरण्यासाठी ७१ लाख ग्राहकांना नोटीस, देण्यात आली आहे. तसेच वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुर करण्यात आला आहे. मात्र १०० युनिट वीज मोफत देणार म्हणून आश्वासन दिलेल्या महा विकास आघाडी सरकारने अन्यायकारक वाढीव वीज बिले पाठवून वसुली सुरू केली आहे, असा आरोप करत भाजपाकडून आज महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

  • पेट्रोल डिझेल भाववाढीवरून शिवसेनेचे केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन
    शिवसेना आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वारंवार वाढ होऊ लागले आहे. पेट्रोलचे दर ९५ रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला महागाईची झळ पोहोचू लागली. या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ प्रश्नी शिवसेनेच्या वतीने आज केंद्र सरकारविरोधात राज्य व्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

  • उद्धव ठाकरे आज औरंगाब आणि बुलडाणा दौऱ्यावर; लोणारला देणार भेट
    उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथून ते बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे पाहणी करणार आहेत. त्यानंतर विश्रामगृहात लोणार सरोवर संवर्धन व विकास बाबत सादरीकरण पाहतील. तसेच औरंगाबादमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत दिल्ली गेट जलकुंभ कामांची पाहणी करणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेतील. नामांतराचा मुद्दा गरम असताना ठाकरे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व असणार आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पुण्यात
    अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा व सार्वजनिक स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे दोन्ही मंत्री आज पुण्यात आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नावर यावेळी बैठक होणार आहे.

  • सोनू सुदच्या मुंबईतील अनधिकृत हॉटेल प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
    सोनू सुद

मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सुदच्या अनधिकृत बाधंकामाविरोधात नोटीस बजावली होती. त्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सुदने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज बंगळुरू येथील एअरो शोच्या कार्यक्रमात संबोधित करतील
    राष्ट्रपती रामनथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोंविंद हे आज बंगळुरू येथील येलाहंका स्थित एयर फोर्स स्टेशनवरील एरो इंडिया-21 च्या समारोपीय कार्यक्रमास संबोधित करणार आहेत.

  • राजधानी दिल्लीमध्ये आजपासून नववी ते अकरावी शाळा सुरू होणार
    दिल्लीतील शाळा सुरु होणार

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या शाळांची घंटा आज वाजणार आहे. दिल्लीतील इयत्ता नववी ते अकरावीचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत,

  • आजपासून भारत विरुद्ध इंग्लडच्या पहिल्या कसोटीला सुरुवात
    कसोटी मालिका सुरू

भारत इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेतील पहिला सामना आज पासून सुरू होणार आहे. चेन्नई येथील चिंदबरम स्टेडीयमवरती हा सामना खेळवला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details