पंतप्रधान मोदींची आज 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
पंतप्रधान मोदींची आज 'मन की बात' मुंबईत आज 37 लसीकरण केंद्रे सुरू
मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रसार होत असताना लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा भासत आहे. यामुळे आज पालिका, राज्य व केंद्र सरकारच्या 30 तर खासगी 7 अशा एकूण 37 लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे.
मुंबईत आज 37 लसीकरण केंद्रे सुरू राज्यात पावसाचा अंदाज
राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी आजपासून पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचे दर जाहीर
कोरोनावरील लस उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने आपल्या कोव्हॅक्सिन लसीचे दर जाहीर केले आहे. राज्य सरकारांसाठी ही लस 600 रुपये प्रति डोस दराने दिली जाणार आहे. तर तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये दराने विक्री केली जाणार आहे. तसेच निर्यातीकरिता 15 ते 20 डॉलर प्रतिलस असे दर निश्चित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार आम्ही कोव्हॅक्सिनचे दर निश्चित करत असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचे दर जाहीर पंजाबमध्ये लॉकडाऊन!
पंजाबमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये फक्त रुग्णालये, मेडिकल स्टोअर आणि अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे.
आज महावीर जयंती साजरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांची जयंती आज साध्या पद्धतीने साजरी होत आहे. कोरोनाच्या संकट दुर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
आज प्रसिद्ध गायक अर्जित सिंगचा वाढदिवस
फिल्मी जगतातील प्रसिद्ध गायकांमधील एक अर्जित सिंगचा आज वाढदिवस आहे. अर्जितने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.
आज प्रसिद्ध गायक अर्जित सिंगचा वाढदिवस आयपीयलमध्ये रंगणार आज दोन सामने
आयपीयलमध्ये आज दोन सामने रंगणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूमध्ये होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 3 वाजून 30 मिनिटांनी हा सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना सनरायजर्स हैदराबादविरोधात दिल्ली कॅपीटल्समध्ये सायंकाळी रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम या स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
आयपीयलमध्ये रंगणार आज दोन सामने