महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर.. - आजच्या ठळक बातम्या

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर..

Important News Events to Look For today
NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर..

By

Published : Mar 20, 2021, 5:51 AM IST

  • राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्के उपस्थिती..
    राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्के उपस्थिती..

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, राज्य शासनाने कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व सरकारी आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.

  • पंतप्रधान मोदी आज बंगाल आणि आसाम दौऱ्यावर..
    पंतप्रधान मोदी आज बंगाल आणि आसाम दौऱ्यावर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगाल आणि आसाम दौऱ्यावर असणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी ते भाजपाचा प्रचार करतील. बंगालच्या खडगपूर आणि आसामच्या चबुआमध्ये ते प्रचारयात्रा घेणार आहेत.

  • राहुल गांधी आज आसाम दौऱ्यावर..
    राहुल गांधी आज आसाम दौऱ्यावर..

राहुल गांधी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी ते काँग्रेसचा प्रचार करत आहेत. आज राहुल गांधी जोरहाट जिल्ह्यातील मरियानी, आणि सोनितपूर जिल्ह्याच्या गोहपूरमधील प्रचारसभांना संबोधित करतील.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहकाची होणार निवड..
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहकाची होणार निवड..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे होत असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहकांची निवड होणार आहे. विद्यमान सरकार्यवाहक भय्याजी जोशी या पदी कायम राहतात, की त्यांच्या जागी इतर कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसना बंदी
    मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसना बंदी

महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशमध्ये आजपासून बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप खासगी वाहनांवर कोणताही निर्बंध लागू करण्यात आला नाही.

  • मध्य प्रदेशच्या तीन शहरांमध्ये आजपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन..
    मध्य प्रदेशच्या तीन शहरांमध्ये आजपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन..

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मध्य प्रदेशच्या तीन शहरांमध्ये आजपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आज रात्री दहा वाजेपासून इंदूर, भोपाळ आणि जबलपूरमध्ये लॉकडाऊन सुरू होईल. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हे लॉकडाऊन लागू असणार आहे.

  • भरतपूरमध्ये आजपासून राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा..
    भरतपूरमध्ये आजपासून राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा..

राजस्थानच्या भरतपूरमध्ये आजपासून राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये देशभरातील महिला आणि पुरुषांचे एकूण ५३ संघ सहभागी होणार आहेत.

  • भारत-इंग्लंडदरम्यान रंगणार पाचवा टी-२० सामना..
    भारत-इंग्लंडदरम्यान रंगणार पाचवा टी-२० सामना..

भारत आणि इंग्लंडच्या टी-२० मालिकेतील पाचवा सामना आज पार पडणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ दोन-दोन विजयांसह बरोबरीने आहेत. त्यामुळे मालिका विजयासाठी आजचा सामना जिंकणे दोघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details