महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर.. - Today imp News

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर...

Important News Events to Look for Today
NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर..

By

Published : Mar 16, 2021, 5:57 AM IST

  • आशियाई ऑलिम्पिक पात्रता संघासाठी आज निवड चाचणी..
    आशियाई ऑलिम्पिक पात्रता संघासाठी आज निवड चाचणी..

भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) आज इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आशियाई ऑलिम्पिक पात्रता संघासाठी एक दिवसीय राष्ट्रीय निवड चाचणी आयोजित करणार आहे. या निवड चाचणी दरम्यान देशातील अव्वल कुस्तीगीर एकमेकांशी सामना करताना दिसतील.

  • रिक्षावाल्यांच्या आर्थिक मदतीप्रश्नी भाजपाची पत्रकार परिषद..
    रिक्षावाल्यांच्या आर्थिक मदतीप्रश्नी भाजपाची पत्रकार परिषद..

रिक्षावाल्यांना अपेक्षित असणाऱ्या मदतनिधीबाबत कोल्हापूर भारतीय जनता पार्टी आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी एकच्या दरम्यान ही पत्रकार परिषद घेण्यात येईल.

  • मराठा आरक्षण प्रकरणी चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद..
    मराठा आरक्षण प्रकरणी चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद..

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दुपारी मराठा आरक्षण प्रकरणी बोलणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापुरामध्ये ते यासंबंधी पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • वीजबिल प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेण्याची शक्यता..
    वीजबिल प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेण्याची शक्यता..

वीजबिल न भरणाऱ्या लोकांची वीज तोडण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार होणार आहे. लॉकडाऊनमध्ये कित्येकांना भरमसाठ वीजबिले मिळाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत आज बैठक घेण्याची शक्यता आहे.

  • डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ७५ वर्षे पूर्ण..
    डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ७५ वर्षे पूर्ण..

आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • ख्वाजा युनूसच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद..
    ख्वाजा युनूसच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद..

मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वझेंवर ख्वाजा युनूस प्रकरणातही संशयाची सुई आहे. ख्वाजा युनूसची पोलिसांकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता. याप्रकरणी बोलण्यासाठी युनूसचे कुटुंबीय आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • राष्ट्रीय लसीकरण दिन..
    राष्ट्रीय लसीकरण दिन..

१६ मार्च हा दिवस भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. १९९५मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. याच दिवशी १९९५ मध्ये पोलिओचा पहिला डोस देण्यात आला होता.

  • योगी आदित्यनाथ आज बंगाल दौऱ्यावर..
    योगी आदित्यनाथ आज बंगाल दौऱ्यावर..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत. बंगालमध्ये या महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुका सुरू होतील. या निवडणुकांसाठी भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून योगींचा हा एकदिवसीय दौरा असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details