- दिल्ली चलो आंदोलनाचा ३४वा दिवस; आजची चर्चा गेली पुढे.. दिल्ली चलो आंदोलनाचा ३४वा दिवस; आजची चर्चा गेली पुढे..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ३४वा दिवस आहे. गेल्या ३३ दिवसांपासून लाखो शेतकरी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर बसून आहेत. दरम्यान, आज कृषी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा होणार होती. मात्र, ही चर्चा आता बुधवारवर ढकलण्यात आली आहे.
- दत्तजयंती निमित्त देवगडकडे जाणारे रस्ते आजपासून बंद.. दत्तजयंती निमित्त देवगडकडे जाणारे रस्ते आजपासून बंद..
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहाणार आहे. हा निर्णय श्री. दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी दिली.
- पूर्वेकडील मालवाहतुकीच्या 'न्यू भाऊपुर-न्यू खुर्जा' विभागाचे उद्घाटन.. पूर्वेकडील मालवाहतुकीच्या 'न्यू भाऊपुर-न्यू खुर्जा' विभागाचे उद्घाटन..
पंतप्रधान मोदी आज इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर (ईडीएफसी)चे न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा विभागाचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर पूर्वेकडील व्यापाराला चालना मिळण्यासाठी या मार्गावर आता मालगाड्यांची ये-जा होणार आहे. सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदी याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करतील.
- विप्रोच्या शेअर्सची बाय-बॅक ऑफर आजपासून सुरू.. विप्रोच्या शेअर्सची बाय-बॅक ऑफर आजपासून सुरू..
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो आजपासून आपले शेअर पुन्हा विकत घेणार आहे. सुमारे साडे नऊशे कोटींचे शेअर्स ११ जानेवारीपर्यंत ही कंपनी विकत घेणार आहे. ४०० रुपये प्रतिशेअर या किंमतीने सुमारे २३.७५ कोटी शेअर्स ही कंपनी विकत घेणार आहे. बिड्सचे शेवटचे सेटलमेंट २० जानेवारी किंवा त्यापूर्वीच होणार आहे.
- डीसी कार्स मालक दिलीप छाबरिया अटक प्रकरणी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद.. डीसी कार्स मालक दिलीप छाबरिया अटक प्रकरणी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद..
डीसी कार्स कंपनीचे मालक दिलीप छाबरिया यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोलीस आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
- बॉक्सिंग डे कसोटीचा चौथा दिवस; भारताचे पारडे जड.. बॉक्सिंग डे कसोटीचा चौथा दिवस; भारताचे पारडे जड..