- आज पंतप्रधान मोदी करणार 'मन की बात'..
आज पंतप्रधान मोदी करणार 'मन की बात'..
आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाचा हा या वर्षातील शेवटचा एपिसोड असेल. यामध्ये पंतप्रधान मोदी शेतकरी कायदे, शेतकरी आंदोलन, २०२०, नववर्ष आणि कोरोना आदी विषयांवर देशातील नागरिकांना संबोधित करतील.
- दिल्ली चलो आंदोलनाचा ३२वा दिवस; शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमांवर..
दिल्ली चलो आंदोलनाचा ३२वा दिवस; शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमांवर..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३२वा दिवस आहे. गेल्या ३१ दिवसांपासून हे शेतकरी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर बसून आहेत. आतापर्यंत झालेल्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आता मंगळवारी पुन्हा शेतकरी आणि सरकार यांमध्ये चर्चा होणार आहे.
- किसान आत्मनिर्भर यात्रेचा समारोप; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित..
किसान आत्मनिर्भर यात्रेचा समारोप; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित..
केंद्राच्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भाजपा आणि रयत क्रांती संघटनेने आयोजित केलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा आज समारोप होईल. सांगलीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
- स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा..
स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा..
भाजप आणि रयत क्रांती संघटनेच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून कडकनाथ संघर्ष यात्रा सुरू करणार आहे. सांगलीमधून या यात्रेची सुरुवात होईल.
- परराष्ट्रमंत्री आजपासून कतारच्या दौऱ्यावर..
परराष्ट्रमंत्री आजपासून कतारच्या दौऱ्यावर..
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान कतार देशाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात जयशंकर यांची कतारचे उपपंतप्रधान शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान बीन जासीम अल-ठाणी आणि कतारचे विदेशमंत्री यांच्याशी बैठक होणार आहे. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर जयशंकर हे पहिल्यांदाच कतारला भेट देणार आहेत.
- अमित शाहांच्या आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस..
अमित शाहांच्या आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आसाम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते इंफाळमध्ये असतील. याठिकाणी ते एका प्रचारसभेला संबोधित करतील, तसेच सभेनंतर ते स्थानिक आदिवासींची भेट घेऊ शकतात.
- इस्राईलमध्ये आजपासून कोरोना लसीकरण..
इस्राईलमध्ये आजपासून कोरोना लसीकरण..
इस्राईल देशामध्ये आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांनी याबाबतची घोषणा केली. नेत्यानहू म्हणाले की आम्ही कोरोना विषाणूला संपवण्यासाठी सज्ज आहोत.
- भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचा दुसरा दिवस..
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचा दुसरा दिवस..
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियासमोर ११ षटकात १ बाद ३६ धावा केल्या आहेत. पदार्पणवीर शुबमन गिल २८ तर, चेतेश्वर पुजारा ७ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांच्या आत रोखल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी सज्ज झाला. मात्र, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सलामीवीर मयंक अग्रवालला शून्यावर माघारी धाडले. रहाणेच्या नेतृत्वात खेळत असलेली टीम इंडिया अजून १५९ धावांनी पिछाडीवर आहे.
- अभिनेता सलमान खान याचा जन्मदिन..
अभिनेता सलमान खान याचा जन्मदिन..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा आज जन्मदिन आहे. दबंग, भाईजान, टायगर अशा अनेक नावांनी त्याला त्याचे चाहते संबोधतात. त्याला अभिनेता म्हणून तसेच सहाय्यक अभिनेता म्हणूनही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. निर्माता म्हणून त्याचा पहिलाच चित्रपट असणाऱ्या चिल्लर पार्टीला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
- मिर्झा गालिब यांची जयंती..
मिर्झा गालिब यांचा जन्मदिवस..
प्रसिद्ध उर्दू आणि फारसी कवी मिर्झा गालिब यांची आज जयंती आहे. वयाच्या ११व्या वर्षापासूनच त्यांनी शेर लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास १८ हजारांहून अधिक फारसी शेर रचले. तसेच, मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी यांपैकी एक हजारांहून अधिक शेर उर्दूमध्येही भाषांतरित केले.