- दिल्ली चलो आंदोलनाचा ३० वा दिवस; दिल्लीकडे मोठ्या प्रमाणात रवाना होणार शेतकरी दिल्ली चलो आंदोलनाचा ३० वा दिवस; दिल्लीकडे मोठ्या प्रमाणात रवाना होणार शेतकरी
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३०वा दिवस आहे. गेल्या २९ दिवसांपासून हे कायदे मागे घ्यावेत यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
- आज जगभरात साजरा होतोय नाताळ.. आज जगभरात साजरा होतोय नाताळ..
येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाणारा नाताळ हा सण आज जगभरात साजरा केला जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच खबरदारी बाळगत हा सण साजरा करण्यात येत आहे.
- आज अटल बिहारी वाजपेयींची जयंती.. आज अटल बिहारी वाजपेयींची जयंती..
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६वी जयंती आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
- शिमला-भोपाळमध्ये अटलजींच्या पुतळ्यांचे अनावरण.. शिमला-भोपाळमध्ये अटलजींच्या पुतळ्यांचे अनावरण..
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शिमल्याच्या रिज मैदानात अटल बिहारी वाजपेयींच्या १८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासोबतच, भोपाळमध्येही १,३०० किलो वजनाच्या १२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
- पंतप्रधान मोदी साधणार सहा राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद.. पंतप्रधान मोदी साधणार सहा राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मोदींनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आखला आहे.
- ९ कोटी शेतकऱ्यांना मिळणार निधी.. ९ कोटी शेतकऱ्यांना मिळणार निधी..