महाराष्ट्र

maharashtra

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..

By

Published : Dec 22, 2020, 9:22 AM IST

आज दिवसभरात होणार आहेत या महत्त्वाच्या घटना...

important news events to look for today
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..

शेतकरी आंदोलनाचा आज २७वा दिवस; संघटना पुढील रणनीती ठरवणार..

शेतकरी आंदोलनाचा आज २७वा दिवस; संघटना पुढील रणनीती ठरवणार..

केंद्रातील कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २६वा दिवस आहे. हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज कृषी संघटनांच्या बैठकीमध्ये आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत रणनीती आखण्यात येणार आहे.

कर्नाटकमधील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान..

कर्नाटकमधील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान..

कर्नाटकच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान आज पार पडेल. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत २३ हजार मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्यटा टप्प्यामध्ये ११७ तालुक्यांमधील ३,१०९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होईल.

जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकांचे आज निकाल..

जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकांचे आज निकाल..

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होईल. गुपकर आघाडी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असणार आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी १४० जागांवर या निवडणुका झाल्या. २८ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या निवडणुकांमध्ये सरासरी ५१ टक्के मतदानाची नोंद झाली.

मनीष सिसोदिया करणार आपच्या 'यूपी मिशन २०२२'चे उद्घाटन..

मनीष सिसोदिया करणार आपच्या 'यूपी मिशन २०२२'चे उद्घाटन..

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आण आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आज उत्तर प्रदेशमध्ये असणार आहेत. २०२२मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या 'यूपी मिशन २०२०'चे ते उद्घाटन करतील.

अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान मोदी संबोधित करतील..

अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान मोदी संबोधित करतील..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला संबोधित करतील. यावेळी ते एका टपाल तिकीटाचेही उद्घाटन करणार आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

newstoday

ABOUT THE AUTHOR

...view details