- आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात
चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून (ता. ९) सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन तुल्यबळ संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
- सचिन वाझेला आज कोर्टात करणार हजर
मुंबई - सचिन वाझेला आज एनआयए कोर्टात हजर करणार आहे. आज वाझेची कोठडी संपत आहे. अँटिलिया कार स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती.
- आरोग्यमंत्री आज घेणार राज्यातल्या कोरोना स्तिथीचा आढावा
मुंबई - राज्यात कोरोनाची स्तिथी बिकट होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते यासंदर्भातली माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची शक्यता आहे.
- पुण्यात व्यापारी आज दुकाने उघडी ठेवणार
पुणे - राज्य सरकारने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध अर्थात मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनला राज्यातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील व्यापारी दुकाने उघडणार आहेत.
- भंडारा जिल्ह्यात आज येणार 24 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस