महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#Newstoday : या घडामोडींवर असणार आज खास नजर

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

Newstoday
Newstoday

By

Published : Jan 29, 2021, 5:51 AM IST

  • 1) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
    संसद

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून, त्यावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.

  • 2) आज राष्ट्रपतींचे दोन्ही सभागृहात अभिभाषण
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज राष्ट्रपतींचे दोन्ही सभागृहात अभिभाषण होणार आहे. देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.

  • 3) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 65 वा दिवस
    दिल्ली शेतकरी आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 65 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.

  • 4) संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल
    आर्थिक सर्वेक्षण अहवाल

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकदिवस आधी हा अहवाल संसंदेत मांडला जातो. हा सर्वेक्षण अहवाल संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांपुढे मांडला जाईल.

  • 5) 'ड्रायव्हरलेस मेट्रो'चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
    मेट्रो

बंगळुरुतून 23 जानेवारीला निघालेली पहिली स्वदेशी आणि ड्रायव्हरलेस मेट्रो रेल्वे गुरुवारी (दि. 28 जाने.) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाली आहे. ही मेट्रो नक्की कशी आहे याची पहिली झलक मुंबईकरांना आज (दि. 29 जाने.) पाहायला मिळणार आहे. आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेट्रोचे अनावरण होणार आहे.

  • 6) हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी विशेष रेल्वे आजपासून धावणार
    हुजूर साहिब नांदेड

कोरोना संकट ओसरल्यानंतर रेल्वे विभागाची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे. रेल्वे बोर्डाने नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष गाडी सुरू केली आहे. आजपासून (२९ जानेवरी) ही रेल्वे गाडी धावणार आहे.

  • 7) खासदार सुप्रिया सुळे आज प्रदेश कार्यालयात जनतेशी साधणार संवाद
    खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनतेशी संवाद साधणार आहेत.

  • 8) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज ऑनलाइन दीक्षांत समारंभ
    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभ आज नाशिक येथे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

  • 9) आज औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत
    सरपंच पदाची सोडत

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व सदस्यांचे लक्ष सरपंच पदाकडे लागले आहे. त्यासाठी आज तहसील स्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

  • 10) नांदेड जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची आज सोडत
    सरपंच पदाची सोडत

नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत आज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details