महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dil Se Desi भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली महत्तवपूर्ण संग्रहालये

भारत स्वतंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण देशाचा इतिहास आणि श्रीमंतीविषयी जाणून घेणार आहोत. देशात महत्त्वांच्या ठिकाणी ही संग्रहालये निर्माण केली गेली आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Dil Se Desi
महत्तवपूर्ण संग्रहालये

By

Published : Aug 12, 2022, 12:13 PM IST

मुंबईभारताला हजारो वर्षांच्या इतिहासाचा समृध्द वारसा लाभलेला आहे ( Dil Se Desi ). देशातील संग्राहलयांमध्ये हा इतिहास जुने अवशेष आणि कलाकृतींच्या रुपात सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. आज आपण देशातील काही प्रसिद्ध संग्रहालयांबद्दल जाणून घेणार आहोत. देशात महत्त्वांच्या ठिकाणी ही संग्रहालये निर्माण केली गेली आहेत. यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या महत्त्व पूर्ण शहरांचा समावेश आहे.

राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली देशातील सर्वात मोठ्या संग्रहलायंपैकी एक दिल्लीतील नॅशनल म्युझियम ( National Museum Delhi )आहे. नॅशनल म्युझियममध्ये दोन लाख कलाकृती संग्रहित असल्याचा दावा करण्यात येतो. या संग्राहलयाला भेट देणे एक अद्भुत अनुभव आहे.

राष्ट्रीय संग्राहालय

नेपियर संग्रहालय तिरुअनंतपुरमनेपियर संग्रहालय हे देखील देशातील सर्वात चर्चेत असलेल्या संग्रहालयातल एक आहे ( Napier Museum ). मुर्त्या, चित्र आणि संगीत वाद्ययंत्रांचा दुर्मिळ संग्रह या ठिकाणी आपल्याला पाहाता मिळतो. नेपियर संग्रहालय भारतातील प्रमुख संग्रहालयांपैकी एक आहे.

नेपियर संग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई या संग्राहलायात भारतातील समृध्द आणि प्रचिन इतिहासाशी संबंधित जवळपाल 50,000 कलकृती संग्रहित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा जगजाहिर आहे ( Chhatrapati Shivaji Maharaj Museum ). त्यामुळे संपूर्ण जगभरातून इतिहास प्रेमी मायानगरी मुंबईलाही भेट देतात.

छत्रपती शिवाजी महाराज

नेवल एविएशन गोवागोवा येथील वास्को द गामा पासून सहा किलोमीटर अंतरावर बोगमालो येथे हे नेवल एविएशनसंग्रहालय ( Naval aviation Museum ) आहे. या ठिकाणी भारतीय वायू सेनेचा विकास कसा झाला ते तुम्हाला पाहाता येईल. भारतीय वायू सेनेला याच ठिकाणाहून बळ मिळाले होते.

नेवल एविएशन

डॉल म्युझियम दिल्ली शंकर्स इंटरनॅशनल हे संग्रहालय लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील आकर्षीत करत आले आहे ( Shankars International Dolls Museum ). येथे देश विदेशांमधून अनेक बाहुल्या डॉल संग्रहित केल्या आहेत.

डॉल म्युझियम

राजकीय संग्रहालय चेन्नईराजकीय संग्रहालय चेन्नई हे संग्रहालय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय ( Government Museum Chennai ) आहे. या ठिकाणी भूविज्ञान, प्राणी विज्ञान आणि वनस्पती विज्ञान या विषयांच्या संबंधित वस्तू संग्रहित आहेत.

राजकीय संग्रहालय

सालारजंग हैद्राबादसालारजंग हे भारतातील सगळ्यात मोठे तीसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय संग्रहालय ( Salar Jung Museum )आहे. याठीकाणी जगभरातील शेकडो प्राचिन वस्तुं संग्रहित करण्यात आल्या आहेत.

सालारजंग

रेल्वे म्युझियम दिल्ली दिल्लीतील हे रेल्वे संग्रहालय हे देशाती टॉपच्या संग्रहालयांपैकी एक आहे ( Railway Museum ). या ठिकाणी तुम्ही भारतीय रेल्वे सेवेचा समृध्द इतिहास एकाच ठिकाणी पाहू शकता. रेल्वे विषयी कुतूहल असणाऱ्यांसाठी जणू हे ठिकाण स्वर्गच आहे.

रेल्वे म्युझियम

भारतीय संग्रहालय कोलकाता भारतीय संग्रहालय ( Indian Museum ) हे संग्रहालय हे जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

भारतीय संग्रहालय

अल्बर्ट हॉल जयपूरअल्बर्ट हॉल संग्रहालय राजस्थानमधील सर्वात जुने संग्रहालय ( Albert Hall )आहे. या ठिकाणी जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक कलाकृती मोठ्या प्रमाणात संग्रहित करण्यात आल्या आहेत.

अल्बर्ट हॉल

हेही वाचा -Dil Se Desi देशभरातील श्रीमंत आणि भाविकांची गर्दी असलेल्या मंदिरांविषयी जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details